आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घराणेशाहीचा वाद:दिवंगत इंदर कुमार यांच्या पत्नीचे करण जोहर व शाहरुख खानवर आरोप, म्हणाली - 'नव-याला खोटे आश्वासन देऊन नंतर ब्लॉक केले होते' 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर घराणेशाही आणि कंपूशाहीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण जोहरवर आहे.
  • इंदर कुमार यांची पत्नी पल्लवीने एक प्रश्न उपस्थित केला- अखेर या मोठ्या लोकांना प्रतिभेला प्रोत्साहन देण्यास काय हरकत आहे? यांना कशाची भीती वाटते?

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर घराणेशाही आणि कंपूशाहीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप झेलणा-या करण जोहरच्या अडचणी कमी व्हायची चिन्हं दिसत नाहीयेत. आता दिवंगत अभिनेता इंदर कुमार यांची पत्नी पल्लवी सराफने करणवर धक्कादायक आरोप केले आहेत. केवळ करणच नाही तर शाहरुख खानवरही तिने आरोप केले आहेत.  

  • सोशल मीडिया पोस्टमध्ये केला दावा

पल्लवीच्या म्हणण्यानुसार, दोन्ही चित्रपट निर्मात्यांनी इंदर यांना केवळ काम देण्याचे खोटे आश्वासन दिले. इतकेच नाही तर काही दिवसांनी दोघांनीही त्यांचा नंबर ब्लॉक केला होता. पल्लवीने हा दावा तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला आहे. इंदर यांनी 'मासूम', 'खिलाडियों का खिलाडी', 'वाँटेड' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांचे 28 जुलै 2017 रोजी वयाच्या 44 व्या वर्षी कार्डियक अरेस्टने निधन झाले होते.

  • 'करणने दोन तास वाट बघायला लावली आणि मग म्हणाला- तुझ्यासाठी काम नाही'

पल्लवीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे- सध्या प्रत्येकजण घराणेशाहीविषयी बोलत आहेत. सुशांत सिंह राजपूत यांच्याप्रमाणेच माझ्या पतीनेही  स्वबळावर प्रसिद्धी मिळवली होती. 90 च्या दशकात ते यशोशिखरावर होते. मला आठवतंय, त्यांचे निधन होण्यापूर्वी ते दोन मोठ्या लोकांकडे काम मागण्यासाठी गेले होते. उदरनिर्वाह व्हावा म्हणून ते लहान-मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करतच होते. मात्र त्यांना त्यांच्या सुरुवातीसारखे एका मोठ्या चित्रपटाचा भाग व्हायचे होते. त्यावेळी ते करण जोहरकडे गेले होते, तेव्हा मी सुद्धा त्यांच्यासोबत होते. हा प्रसंग माझ्या डोळ्यादेखत घडला होता. करण यांनी जवळपास दोन तास आम्हाला त्यांच्या गाडीच्या बाहेर वाट पाहत ठेवले होते. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या मॅनेजरने येऊन करण जोहर सध्या कामात आहेत, असे सांगितले. मात्र तरीदेखील आम्ही त्यांची वाट पाहत होतो त्यानंतर करण बाहेर आला आणि इंदर गरिमाच्या संपर्कात रहा. पण सध्यातरी तुझ्यासाठी कोणतेच काम नाही, असे करणने आम्हाला सांगितले. त्यानंतर इंदर यांनी 15 दिवसांनी करणला पुन्हा एकदा कामासाठी फोन केला तर करणने इंदरचा नंबर ब्लॉक केला होता', असा अनुभव पल्लवीने आपल्या पोस्टच्या माध्यमातून कथन केला आहे.

  • शाहरुखकडेही करणसारखाच अनुभव आला 

शाहरुख खानबरोबर इंदर यांच्या भेटीविषयी सांगताना पल्लवीने लिहिले - इंदरला शाहरुख खानकडूनही अशीच वागणूक मिळाली होती. ते इंदरला भेटले आणि सध्या माझ्याकडे तुझ्यासाठी काम नाही, मात्र आठवड्याभरात फोन करेल असे सांगितले. हे सर्व 'झिरो' चित्रपटाच्या सेटवर घडले. शाहरुखने त्याची मॅनेजर पूजाशी संपर्क साधण्यास सांगितले होते. पण गरीमाने जे केले तेच तिने केले होते, असे पल्लवी म्हणाली. 

या दोन मोठ्या निर्मिती संस्थांकडे कोणतेच काम नव्हते यावर कोणी विश्वास ठेऊ शकेल? करण जोहरने बर्‍याच वेळा म्हटले आहे की, तो स्टारबरोबर काम करतो. बरं माझे पतीदेखील एक स्टार होते. लोक अजूनही त्यांना त्यांच्या कामासाठी ओळखतात, असेही ती म्हणाली आहे. 

  • पल्लवीचा प्रश्न - ही मोठी माणसे प्रतिभेला का घाबरतात?

 या मोठ्या लोकांना प्रतिभेला मदत करण्यात काय अडचण आहे? त्यांना कशाची भीती वाटते?, असा प्रश्न पल्लवीने आपल्या पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. ती लिहिते - मी  एवढेच सांगू शकते की हे वाईट लोक आहेत जे चांगले असल्याचे ढोंग करतात. नेपोटिज्म थांबले पाहिजे. लोक मरत आहेत आणि या मोठ्या लोकांना अद्याप त्याचे परिणाम समजत नाहीयेत. अशा लोकांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे, असे पल्लवी म्हणाली आहे. 

  • इंदर कुमार यांची तिसरी पत्नी आहे पल्लवी 

इंदर कुमार यांनी तीन लग्न केले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव सोनल करिया होते. तिच्यापासून इंदर यांना एक मुलगी आहे. तिचे नाव खुशी आहे. 2003 साली इंदर यांनी दिग्दर्शक राज करिया यांची मुलगी सोनलसोबत लग्न केले होते. लग्नाच्या केवळ पाच महिन्यात दोघे वेगळे झाले. यानंतर इंदर यांनी 2009 साली कमलजीत कौर नावाच्या मुलीसोबत लग्न केले पण हे लग्नही 2 महिन्यांतच तुटले. यानंतर पल्लवी सराफसोबत त्यांनी लग्न केले होते. त्यांना एक मुलगी असून सावन हे तिचे नाव आहे.

  • 'मासूम' चित्रपटाने केला होता डेब्यू 

1996 साली आलेल्या ‘मासूम’चित्रपटाद्वारे इंदर यांनी करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी 'गजगामिनी', 'खिलाडियों का खिलाडी' यांसारख्या चित्रपटातही काम केले. 2009 साली सलमान खानच्या सुपरहिट फिल्म ‘वाँटेड’मध्ये ते दिसले होते. याशिवाय त्यांनी 'तुमको न भूल पाएंगे' (2002) और 'कहीं प्यार न हो जाए' (2000) चित्रपटात सलमान खानसोबत काम केले. इंदर यांनी 2002 साली 'क्योंकि सास भी कभी बहू थी' (2002) मध्ये मिहिर विरानीची भूमिका वठवली होती.  

बातम्या आणखी आहेत...