आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इरफान खानच्या मुलाचा निर्णय:बाबिल खानने अभिनयासाठी शिक्षण अर्धवट सोडले, म्हणाला - आता मला माझे पूर्ण लक्ष अभिनयावर केंद्रित करायचे आहे

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुसऱ्या चित्रपटावर काम करतोय इरफानचा मुलगा बाबिल

दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिलने अर्धवट शिक्षण सोडले आहे. तो लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टमिन्स्टर येथून फिल्म कोर्स करत होता. स्वतः बाबिलने शिक्षण अर्ध्यावर सोडत असल्याची माहिती आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन दिली आहे. आपल्या अभिनयावर फोकस करण्यासाठी कॉलेज साेडण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्याने म्हटले आहे. सोबतच आपल्या या नोटमध्ये त्याने आपल्या मित्रांसाठी लिहिले, 'माझ्या खास मित्रांनो मला तुमची फार आठवण येईल.'

बाबिलने आपल्या कॉलेजच्या दिवसांतील व्हिडिओ कॅमेरा हँडल करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. तो म्हणाला, 'मी माझे बीएचे शिक्षण अर्धवट सोडत आहेत. यामागे 120 कारणे आहेत. पण त्यापैकी सर्वात मोठे कारण म्हणजे मला आता माझ्या अभिनय करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. गुडबाय युनिव्हर्सिटी ऑप वेस्टमिन्स्टर. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.' बाबिल युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टमिन्स्टर येथून तीन वर्षांचा फिल्म बीएचा कोर्स करत होता.

अनुष्का शर्माच्या 'काला'द्वारे करतोय डेब्यू
बाबिल ‘काला’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री आणि निर्माती अनुष्का शर्माच्या होम प्रॉडक्शनच्या चित्रपटातून बाबिलचे पदार्पण होत आहे. अनुष्का शर्माचे प्रॉडक्शन हाऊस 'क्लीन स्लेट फिल्म्स'ने पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सशी हातमिळवणी केली आहे. रिपोर्ट्सनुसार, बाबिलचा पदार्पणातील 'काला' हा एक थ्रिलरपट असेल. या चित्रपटात बाबिलची मुख्य भूमिका असून 'बुलबुल' चित्रपटात झळकलेली तृप्ती डिमरी त्याच्यासह झळकणार आहे. तर अन्विता दत्त या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. अभिनेत्री स्वस्तिक मुखर्जीदेखील 'काला'मध्ये बाबील आणि तृप्ती यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

शूजित सरकारच्या चित्रपटातही झळकणार बाबिल
बाबिलचा काला हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच त्याला त्याच्या कारकिर्दीचा दुसरा चित्रपट मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शूजित सरकार करणार आहेत. याचे निर्माते रॉनी लाहिरी आहेत. सोशल मीडियावर बाबिल आणि शुजितसोबतचे एक छायाचित्र शेअर करताना त्यांनी लिहिले, ‘आपला वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे इरफान सर. तुमच्यासारख्या उत्कृष्ट अभिनेत्याबरोबर काम केले आहे आणि आता तुमचा मुलगा बाबिलसोबत काम करणार.'

दुसरीकडे बाबिल म्हणाला, इतक्या उत्कृष्ट िदग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळणे सन्मानाची बाब आहे. शूजितने 2015 मध्ये कॉमेडी नाट्य ‘पीकू’चे दिग्दर्शन केले होते, त्यात हीरो इरफान खान होते. याच्या निर्मितीचे काम रॉनी लहरीने केले होते.

बातम्या आणखी आहेत...