आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिवंगत अभिनेते चिरंजीवी सरजा यांची पत्नी मेघना राज यांनी सोशल मीडियावर त्यांच्यासह त्यांच्या नवजात बाळाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. यासह मेघना यांच्या आईवडिलांचाही कोविड 19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले आहे. आमच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकासाठी ही माहिती असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.
मेघना यांनी लिहिले - चिरु (चिरंजीवी) यांचे मित्र आणि चाहत्यांनी घाबरू नका. आमच्यावर उपचार सुरू असून आपण बरे आहोत. ज्युनिअर देखील ठीक आहे. एक कुटुंब म्हणून, आम्ही ही लढाई लढू आणि विजयी होऊ. मेघना यांच्या या पोस्टवर सर्वांनी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
चिरूच्या मृत्यूनंतर खूप महत्त्वाचा धडा शिकले - मेघना
चिरंजीवी यांच्या मुलाचे बारसे त्यांच्या आईवडिलांच्या घरी झआले होते. मेघना यांनी सोशल मीडियावर याबाबतही माहिती दिली होती. चिरंजीवी यांच्या निधनावर मेघना म्हणाल्या होत्या की, "चिरूच्या निधनानंतर मला असे वाटले की माझ्या जीवनाचा पाया ढासळला आहे. मी अशी व्यक्ती होती जी प्रत्येक गोष्टीची योजना आखत असे. तर, चिरू अगदी या उलट होता. तो आयुष्यातील प्रत्येक्ष क्षण जगायचा आणि मलाही प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यास सांगायचा. चिरू गेल्यानंतर भविष्यापेक्षा वर्तमानात जगून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला हवा, हा एक महत्त्वाचा धडा मला मिळाला. कारण उद्या काय घडेल हे कोणालाच ठाऊक नाही."
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.