आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:कन्नड अभिनेते चिरंजीवी सरजा यांची पत्नी आहे गरोदर, बाळाचा चेहरा बघण्यापूर्वीच घेतला जगाचा निरोप  

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिरंजीवी यांचे 2 मे 2018 रोजी कन्नड अभिनेत्री मेघना राजसोबत लग्न झाले होते.

कन्नड चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजा यांचे रविवारी 7 जून रोजी निधन झाले. हृदय विकाराच्या झटक्याने वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून ते आता अनंतात विलीन झाले आहेत. त्यांच्या फार्महाऊसमध्येच त्यांचे अंत्यविधी झाले. चिरंजीवी यांच्या अकाली निधनाने कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.  

दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न, पत्नी मेघना आहे गरोदर 

चिरंजीवी यांचे 2 मे 2018 रोजी कन्नड अभिनेत्री मेघना राजसोबत लग्न झाले होते. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे. तसेच मेघना आता गरोदर असल्याचे समोर आले आहे. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार चिरंजीवी यांची पत्नी मेघना गर्भवती आहे. तसेच ते दोघेही आपल्या पहिल्या बाळाच्या जन्माची वाट पाहात होते. पण त्या दोघांनीही या बाबात कोणतीही अधिकृत माहिती दिली नव्हती. 

22 चित्रपटांमध्ये केला अभिनय

चिरंजीवी यांनी 2009 मध्ये वायूपूत्र या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला होता. तसेच त्यांनी अम्मा आय लव्ह यू, राम लीला, चंद्रलेखा, चिरु या चित्रपटांसह एकुण 22 कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

12 मार्च रोजी प्रदर्शित झालेला शिवार्जुन हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला आहे. त्यांचे आजोबा शक्ती प्रसाद आणि काका अर्जुन सरजा हे देखील चित्रपट कलाकार आहेत. त्यांचे भाऊ ध्रुव सरजा हेदेखील चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहेत.

बातम्या आणखी आहेत...