आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मालमत्ता प्रकरण वाद:दिवंगत वाजिदच्या पत्नीची मुंबई उच्च न्यायालयात धाव,  भाऊ साजिद म्हणाले - 'माझ्या कुटुंबाला मालमत्तेत रस नाही, कमलरुखची नियतच बदलली'

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • साजिद म्हणाले - माझ्यासाठी कुटुंबाहून श्रेष्ठ काही नाही

दिवंगत संगीतकार वाजिद खानची पत्नी कमलरुखने मुंबई उच न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. कमलरुखनुसार, वाजिदने 2012 मध्ये एक वारसा हक्क तयार केला, त्यात त्यांनी कमलरुख आणि त्यांच्या मुलांच्या नावे मालमत्ता केली होती. या मालमत्तेत वाजिदचे भाऊ साजिद खान किंवा त्यांची आई हिस्सेदार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाची सुनावणी 23 एप्रिल रोजी होईल आणि यादरम्यान वाजिदचे भाऊ साजिद यांनीही आपली बाजू मांडली आहे. दिव्य मराठी नेटवर्कला त्यांनी सांगितले की, आपल्याला व आईला वाजिदच्या मालमत्तेत रस नाही. कमलरुखची वागणूक त्यांच्या नियतीवर प्रश्न उपस्थित करते.

माझ्यासाठी कुटुंबाहून श्रेष्ठ काही नाही
साजिद म्हणाले, 'मी कायदेशीरदृष्ट्या अनेक बाबी समोर आणू शकत नाही. मात्र, माझे व कुटुंबाचे याच्याशी देणेघेणे नाही. भाऊ जिवंत होता तेव्हा कमलरुखला या गोष्टी लक्षात आल्या नाहीत. आता वाजिद गेल्यानंतर मी त्यांच्याशी चुकीचे वागतोय असे त्यांना वाटत आहे. माझ्यावर आरोप लावले जाताहेत, मात्र आम्हाला सत्य माहीत आहे. आम्ही घरातल्या गोष्टी बाहेर आणू इच्छित नाही त्यामुळे गप्प आहे. वाजिदचे आपल्या मुलांवर जिवापाड प्रेम होते.'

बातम्या आणखी आहेत...