आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मपरिवर्तनासाठी दबाव आणल्याचा आरोप:दिवंगत संगीतकार वाजिद खानच्या पत्नीचा खुलासा, म्हणाल्या - वाजिदने घटस्फोटाची धमकी दिली होती, आम्ही सहा वर्षांपासून वेगळे राहात होतो

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाजिद यांनी मागितली होती कमलरुख यांची माफी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक संगीतकार वाजिद खान यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. आता वाजिद यांच्या पत्नी कमलरुख खान यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. पती वाजिद खानने आपल्याला घटस्फोटाची धमकी दिली होती, असे त्यांनी म्हटले आहे. मागील सहा वर्षांपासून वेगळे राहात असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. कमलरुख यांनी अलीकडेच एक वृत्तावाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या दिवंगत पतीवर आरोप केले आहेत.

10 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर केले होते लग्न
उज्ज्वल त्रिवेदी यांना दिलेल्या मुलाखतीत कमलरुख खान यांनी सांगितले, 'मी आणि वाजिदने दहा वर्षे रिलेशनमध्ये राहिल्यावर लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण 2014 मध्ये त्याने माझ्यावर धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. मी एका पारसी कुटुंबातून आहे. धर्मपरिवर्तन करणे मला मान्य नाही. तरीही वाजिदने मी इस्लाम धर्म स्वीकारणासाठी आग्रह धरला. त्यानंतर त्याने मला घटस्फोटाची धमकीही दिली होती' असे कमलरुख म्हणाल्या.

वाजिद यांनी मागितली होती कमलरुख यांची माफी
कमलरुख पुढे म्हणाल्या, '2014 मध्ये वाजिदने घटस्फोटाचा अर्ज देखील केला होता. पण तेव्हा घटस्फोट झाला नाही. पण नंतर वाजिदला त्याची चूक कळाली. त्याने माझी माफी देखील मागितली होती.'

सोशल मीडियावर मांडली होती व्यथा
यापूर्वी कमलरुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वाजिदचे कुटुंबीय धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकत असल्याचे सांगितले होते. त्यांनी वाजिद यांच्या कुटुंबियांवर इस्लाम धर्म स्विकारावा म्हणून खान कुटुंबियांनी आपला छळ केल्याचा गंभीर असा आरोप केला होता. कमलरुख खान या मूळच्या पारसी आहेत. त्यांच्या कुटुंबात नेहमीच स्त्रियांना मान सन्मान मिळाला. त्यांच्या मतांना तितकाच आदर देखील दिला जातो. सुसंस्कृत, सुशिक्षित कुटुंबात वाढलेल्या कमलरुख यांचा वाजिद खान यांच्यासोबत निकाह झाला. पण वाजिद यांच्या घरात याऊलट वातावरण असल्याचं त्यांनी म्हटले होते.

स्त्रियांना स्वत:चे मत असू शकते हे खान कुटुंबात नाकारण्यात आले. माझ्यावर सतत इस्लाम धर्म स्विकारावा यासाठी दबाव आणला गेला. मी नेहमीत त्यांच्या धर्माचा, संस्कृतीचा आदर करत आले. पण त्यांच्याकडून मी इस्लाम धर्म स्विकारावासाठी छळ देखील करण्यात आला. इतकेच नाही तर, इस्लाम स्विकारला नाही म्हणून मला आणि वाजिदला दूर करण्यासाठीही प्रयत्न केले गेले होते. आमच्यामध्ये घटस्फोट घडवून आणण्याचाही प्रयत्न खान कुटुंबियांकडून केला गेला. मी इस्लाम धर्म स्विकारायला तयार नव्हते, यासाठीमी शेवटपर्यंत नकार दिला. वाजिदच्या निधनानंतरही हे सुरूच आहे. माझे पती वाजिद खान हे चांगले संगीतकार होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अधिक वेळ संगीतासाठी दिला होता. त्यांनी मला आणि मुलांसोबत आणखी वेळ घायवायला हवा होता, धर्मांतरावरून सुरू असलेल्या वादामुळे आम्ही एकमेकांना वेळ देऊ शकलो नाही, असे कमलरुख यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले होते.

1 जून रोजी झाले होते वाजिद यांचे निधन

साजिद-वाजिद जोडीतील प्रसिद्ध वाजिद खान यांचे 1 जून 2020 रोजी निधन झाले होते. त्यांनी भाऊ साजिदसोबत 'दबंग' (फ्रेंचाइजी), 'हीरोपंती', 'चश्मे बद्दूर', 'एक था टाइगर', 'पार्टनर', 'मुझसे शादी करोगी', 'तेरे नाम' आणि 'हम तुम्हारे हैं सनम' या चित्रपटांना सुपरहिट संगीत दिले होते.

बातम्या आणखी आहेत...