आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पलटवार:लविना लोधविरोधात महेश आणि मुकेश भट्ट यांनी दाखल केला एक कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा; या दोघांवर अभिनेत्रीने केले होते गंभीर आरोप

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लविनाच्या म्हणण्यानुसार तिचे लग्न महेश भट्ट यांचा भाचा सुमित सभरवालसोबत झाले होते.
  • अभिनेत्री लविनाचा आरोप आहे की, सुमित हा ड्रग्ज आणि मुली सप्लाय करतो.

चित्रपट दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट आणि त्यांचे बंधु मुकेश भट्ट यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात अभिनेत्री लविना लोधविरोधात एक कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. तीन दिवसांपूर्वी (शुक्रवारी) अभिनेत्रीने महेश भट्ट यांना इंडस्ट्रीतला सर्वात मोठा डॉन म्हणत तिला धमकावल्याचा आणि घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला होता.

याबाबत सोमवारी तातडीने सुनावणीसाठी याचिका दाखल केली गेली. न्यायमूर्ती ए.के. मेनन यांच्या खंडपीठाने यासंदर्भात नोटीस बजावत लोथ हिला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या या खटल्याची सुनावणी ती आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान, लोधच्या वकिलांनी कोर्टाला आश्वासन दिले की, लविना सुनावणीच्या काळात दोन भावांविरुद्ध कोणतेही वक्तव्य प्रसिद्ध किंवा प्रसारित करणार नाही.

लविनाचे हे आहेत आरोप

लविनाच्या म्हणण्यानुसार, तिचे लग्न महेश भट्ट यांचा भाचा सुमित सभरवालशी झाले होते. तिचा आरोप आहे की, सुमित हा ड्रग्ज आणि मुली सप्लाय करतो, त्यामुळे तिने त्याच्याकडे घटस्फोट मागितला. तेव्हापासून महेश भट्ट आपल्यामागे हात धुवून लागले आहेत. त्यांनी घरात शिरुन तिला घराबाहेर काढण्याच्या प्रयत्न केला होता, असा खळबळजनक आरोप लविनाने केला आहे.

व्हिडिओ मेसेजमध्ये या गोष्टी सांगितल्या

'महेश भट्ट यांना सर्व गोष्टींची माहिती आहे'

व्हिडिओमध्ये लविना म्हणतेय - “माझे नाव लविना लोध असून हा व्हिडिओ मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी करत आहे. माझे लग्न महेश भट्टच्या भाच्यासोबत सुमित सभरवाल सोबत झाले असून मी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. सुमित ड्रग्ज सप्लाय करतो. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे फोटो आहेत. यात अमायरा दस्तूर आणि अशा अनेक अभिनेत्रींचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आहेत आणि हे फोटो तो दिग्दर्शकांना दाखवतो. तो कलाविश्वात मुली सप्लाय करतो. या सगळ्याची कल्पना महेश भट्टला आहे”, असे आरोप लविनाने केले होते.

'महेश भट्ट या कलाविश्वातील सर्वात मोठा डॉन'

लविना पुढे म्हणाली आहे -महेश भट्ट हे बॉलिवूडमधील डॉन आहेत. त्यांच्या एका फोनमुळे एखाद्या कलाकाराचे आयुष्य उद्धस्त होऊ शकते. अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि संगीतकारांना त्यांनी कामावरुन काढून टाकले, असे ती म्हणाली आहे.

या प्रकरणात भट्ट बांधवांचे स्पष्टीकरण

लविनाच्या आरोपांवर भट्ट बंधूंच्या वतीने स्पष्टीकरण आले आहे. त्यांच्या लीगल टीमने लविनाचे सर्व आरोप फेटाळून लावताना म्हटले की, “लविना लोधने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओच्या संदर्भात. आम्ही आमचे क्लायंट महेश भट्ट यांच्या वतीने हे आरोप फेटाळतो. हे आरोप केवळ खोटे आणि अपमानकारक नसून कायद्यात गंभीर परिणाम असणारे आहेत. आमचे क्लायंट कायदेशीर सल्ला घेतील आणि योग्य कारवाई करतील.''