आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लक्ष्मी' पाहिल्यानंतर प्रेक्षकांची प्रतिक्रिया:प्रेक्षकांना भावला नाही अक्षय कुमारचा 'लक्ष्मी' हा चित्रपट, सोशल मीडियावरुन करत आहेत टीका

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूजर्स या चित्रपटावर कडाडून टीका करत आहेत.

राघव लॉरेन्स दिग्दर्शित अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी स्टारर 'लक्ष्मी' हा चित्रपट सोमवारी डिस्ने प्लस हॉट स्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. मात्र सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रिया बघता त्यांना हा चित्रपट आवडला नाही, असे दिसते. यूजर्स या चित्रपटावर कडाडून टीका करत आहेत. एका यूजरने लिहिले की, "मी अनेक तासांच्या थकव्याातून ब्रेक घेण्यासाठी लक्ष्मी बॉम्ब पाहिला, पण आता मी अधिक दमलो आहे."

एका यूजरने ट्विट केले, "लक्ष्मी बॉम्ब का बघावा? त्याऐवजी तुम्ही 'कांचना' हा तमिळ चित्रपट पाहू शकता. लक्ष्मी बॉम्बमध्ये प्रत्येक सीन कॉपी करण्यात आला आहे."

एका यूजरने लिहिले, "प्रत्यक्षात चांगली स्क्रिनिंग आणि अभिनय अपेक्षित होता. पण लक्ष्मीची भूमिका चांगली साकारली गेली नाही. लक्ष्मी बॉम्ब पाहिल्यानंतरचा रिव्ह्यू 'छी'.

आणखी एका यूजरने लिहिले, "लक्ष्मीने अपेक्षाभंग केला. मी त्यासाठी खास आयएमडीबी डाउनलोड केली, त्यावर माझे अकाऊंट तयार केले जेणेकरुन मी रेटिंग आणि रिव्ह्यू देऊ शकेन. सहसा मी वाईट चित्रपटांबद्दल तक्रार करत नाही, परंतु मी एका महिन्यासाठी हॉटस्टारची सदस्यता घेतली, जेणेकरून मी हा चित्रपट पाहू शकेन."

एका यूजरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "लक्ष्मी बॉम्ब फर्स्ट डे फर्स्ट शो. मी स्वत:वर आणखी अत्याचार करू शकत नाही, म्हणून मी चित्रपट अर्ध्यावर सोडला."

शरद केळकरच्या अभिनयाचे कौतुक

या चित्रपटात शरद केळकरच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. एका यूजरने लिहिले, "मी अक्षय कुमार सरांचा एक मोठा चाहता आहे. पण शरद केळकर या चित्रपटातील नायक आहेत. जबरदस्त अभिनय. जेव्हा तुम्ही रडलात तेव्हा मलाही अश्रू अनावर झाले. तुम्हाला शुभेच्छा."

आणखी एका यूजरने लिहिले, "नुकताच लक्ष्मी बॉम्ब पाहिला. शरद सर तुम्ही छान आहात. लक्ष्मी बॉम्बमध्ये तुम्ही उत्कृष्ट अभिनय केला आहे. आपल्यासारख्या कलाकारांचा अभिमान वाटतो."

एका यूजरने ट्विट केले, "जर अक्षय कुमार चित्रपटाचे हृदय असेल तर शरद केळकर त्याचा आत्मा आहे.'

बातम्या आणखी आहेत...