आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी त्यांच्या निधनाबद्दल पसरलेल्या अफवांवर दु: ख व्यक्त केले आहे. गेल्या आठवड्यात त्यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. एका इंग्रजी वेबसाइटसोबत बोलताना त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा माझे कुटुंब अधिकृतपणे जाहिर करतील, असे त्या म्हणाल्या आहेत.
72 वर्षीय मुमताज म्हणाल्या, "मी ठीक आहे आणि अद्याप जिवंत आहे. मला आनंद आहे की, कुणीतरी अधिकृत जाणून घेण्यासाठी मला कॉल केला. कुणी हे हेतुपुरस्सर का करीत आहे हे मला समजत नाहीये. ही थट्टा आहे का?" गेल्या वर्षीसुद्धा अशा अफवांनी माझे कुटुंब हादरुन गेले होते. सगळ्यांनी मला कॉल केले होते."
मुमताज पुढे म्हणाल्या, "माझे चाहते जगातील वेगवेगळ्या कोप-यात आहेत आणि या बातमीने त्यांना दुःख झाले. मलाही खूप त्रास झाला आहे. यावर्षी माझ्या मुली, नातवंडे, जावई आणि माझे पती सर्व लंडनमध्ये आहेत. लॉकडाऊनने आम्हा सर्वांना घरी एकत्रित आणि सुरक्षित ठेवले आहे. माझे जगभरातही नातेवाईक आहेत, जे बातमी वाचल्यानंतर काळजीत पडले होते. लोक मला का मारु इच्छितात? जेव्हा वेळ येईल तेव्हा मी हे जग सोडून निघून जाईन."
या बातचीतमध्ये मुमताज यांनी सांगितले की, त्यांचा भाचा शाद रंधावा आणि बहीण मल्लिका मुंबईत राहतात. लोकांनी कमीतकमी त्यांच्याकडून खात्री करुन घ्यायला हवी. त्या म्हणाल्या, "जेव्हा मी मरेन, तेव्हा माझे कुटुंब अधिकृतपणे जाहिर करतील. हे एखादे सिक्रेट राहणार नाही. ही बातमी सर्वत्र असेल."
मुमताज पुढे म्हणाल्या, "मला हे माहित आहे आणि खात्री आहे की मृत्यू ही जीवनाचे वास्तव आहेय. प्रत्येकाला एक दिवस हे जग सोडून जायचे आहे. परंतु अशा मृत्यूच्या सापळ्यात मी अडकणार नाही, जो आमच्यातील काहींच्या बाबतीत वर्षातून एकदा किंवा दोनदा रचला जातो."
2000 मध्ये मुमताज यांना स्तनाचा कर्करोग झाला होता. यातून त्या यशस्वीरित्या बाहेर पडल्या. आता त्या पूर्णपणे ठीक आहेत. त्या बर्याच दिवसांपासून लंडनमध्ये राहत आहे. त्यांची मोठी मुलगी नताशाने फिरोज खान यांचा मुलगा आणि अभिनेता फरदीन खानबरोबर लग्न केले आणि तीही लंडनमध्ये स्थायिक झाली. त्यांची लहान मुलगी तान्या रोममध्ये राहते. मुमताज यांनी 'गहरा दाग', 'हमराज', 'आपकी कसम', 'रोटी' आणि 'नागिन' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची जोडी राजेश खन्नासोबत चांगलीच पसंत केली जात होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.