आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीची व्यथा:मधुबालाची भाची परवेझने न्यूझीलंडच्या पंतप्रधानांना लिहिले पत्र, आई कनीज बलसारासोबत वहिनीने केलेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परवेझ यांनी पत्रात आईसोबत झालेल्या अत्याचाराची संपूर्ण कहाणी सांगितली

ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री मधुबाला यांची मोठी बहीण कनीज बलसारा यांना त्यांच्या सुनेने दोन आठवड्यांपूर्वी घरातून हाकलून दिले होते. 96 वर्षीय कनीज बलसारा न्यूझीलंडमधील ऑकलंडमध्ये मुलगा आणि सुनेसोबत राहत होत्या. पण त्यांच्या सुनेने त्यांना घरातून हाकलून देताना त्यांना पैसे आणि जेवण न देता मुंबईच्या फ्लाइटने भारतात पाठवले होते. मात्र आता कनीज बलसारा मुंबईत त्यांची मुलगी परवेझ सोमजीच्या घरी राहत असून सुरक्षित आहे. आता बातम्यांनुसार, परवेझ सोमजी यांनी नुकतेच न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांना पत्र लिहिले आहे.

परवेझ यांनी पत्रात आईसोबत झालेल्या अत्याचाराची संपूर्ण कहाणी सांगितली
या पत्रात परवेझ सोमजी यांनी आपल्या आईवर झालेल्या अत्याचाराची संपूर्ण कहाणी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांना सांगितली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परवेझ सोमजींना वाटले की, संपूर्ण घटनेबाबत पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांना सांगणे अधिक योग्य ठरेल. याबाबत परवेझ सोमजी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, "होय, मी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे हे खरे आहे. पण, मला याबाबत अधिक काही सांगायचे नाही.'

परवेझ सोमजीची मावशी आणि मधुबाला यांची धाकटी बहीण मधुर भूषण यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत कनीज बलसारा यांची व्यथा सांगितली होती. कनीज यांची सून समीनाने त्यांना न्यूझीलंडहून भारतात पाठवल्याचे मुलगी परवेझला देखील कळवले नव्हते. कनीज भारतात आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने परवेझ यांना दिली होती.

समीनाला तिचे सासू-सासरे आवडत नाहीत
काही दिवसांपूर्वी मीडियाशी बोलताना परवेझ म्हणाल्या होत्या, 'आई 17-18 वर्षांपूर्वी न्यूझीलंडला गेली होती. तिचे माझा भाऊ म्हणजेच तिचा मुलगा फारुकवर खूप प्रेम होते आणि ती त्याच्याशिवाय राहू शकत नव्हती. भाऊसुद्धा आई बाबांवर प्रेम करत असे, म्हणूनच तो त्यांना सोबत घेऊन गेला. तो न्यूझीलंडच्या करेक्शन डिपार्टमेंटमध्ये काम करायचा. पण वहिनीला आमचे आई-वडील आवडत नाहीत. माझी आई मुंबईत आल्यानंतर मला समजले की माझा भाऊ आता या जगात नाही. भाऊ गेल्यानंतर वहिनीची वागणूक अतिशय वाईट झाली होती.'

नातही आजीला वाईट वागणूक देत असे
परवेझ पुढे म्हणाल्या होत्या, 'समीना कधीच आई आणि बाबांसाठी जेवण बनवत नसे. भाऊ रेस्तराँमधून त्यांच्यासाठी जेवण आणत असे. समीनाची मुलगी जिचे ऑस्ट्रेलियात लग्न झाले ती देखील तिच्या आजीसोबत गैरवर्तन करायची. समीनाने माझ्या आईला घराबाहेर काढले आणि जबरदस्तीने फ्लाइटमध्ये बसवले. तेव्हा समीनाची मुलगी देखील विमानतळावर उपस्थित होती.'

गेली 5 वर्षे आई भारतात आली नव्हती
परवेझ यांनी सांगितले होते, 'मी अनेकदा न्यूझीलंडला जाते, कधी कधी वर्षातून दोनदा देखील तिथे जाणे होत असते. आईसुद्धा दोनदा भारतात आली होती. पण गेली पाच वर्षे ती आलीच नाही, कारण माझा भाऊ म्हणायचा की या वयात तिचं येणं सुरक्षित नाही. जास्त उंचीवर ऑक्सिजनच्या पातळीत चढ-उतार होतात, जे आईच्या आरोग्यासाठी चांगले नसते.'

आईजवळ आरटी-पीसीआरसाठीही पैसे नव्हते
परवेझ यांनी रडत सांगितले होते, 'फ्लाइट लँड झाल्यानंतर मला विमानतळ प्राधिकरणाचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की तुमच्या आईकडे आरटी-पीसीआर चाचणीसाठी पैसे नाहीत. त्यानंतर मी त्यांना पैसे पाठवले, त्यानंतर तिचा आरटी-पीसीआर झाला. मला भेटल्यानंतर ती सर्वप्रथम म्हणाली होती की, बेटा तुला माहित आहे का की फारुख आता नाही? मी त्याचे अंत्यसंस्कार करुन आले आहे आणि मला खूप भूक लागली आहे, मला काही खायला मिळेल का?' त्यानंतर मी माझ्या आईला घरी आणले, तिला खाऊ घातले. देवाचे आभार, निदान आई आता सुखरूप आहे.'

बातम्या आणखी आहेत...