आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायोपिकची तयारी सुरु:दिग्गज गायक किशोर कुमार यांचे कुटुंब बनवणार त्यांच्यावर बायोपिक, मुलगा अमित कुमार म्हणाला- त्यांना त्यांच्या कुटुंबापेक्षा चांगलं कोण ओळखू शकतं

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्क्रिप्ट तयार होण्यासाठी एक वर्ष लागेल

अलीकडेच, किशोर कुमार यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनावर बायोपिक येणार असल्याचे वृत्त आले होते. गांगुली कुटुंब म्हणजे किशोर कुमार यांची मुले अमित, सुमीत आणि पत्नी लीना चंदावरकर त्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवणार आहेत. कुटुंबातील सदस्यच या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती करणार आहेत. कुटुंबीयांनी आता या बायोपिकची तयारी सुरू केली आहे.

एका मुलाखतीदरम्यान किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार म्हणाला, 'मला पुर्वीपासूनच माझ्या वडिलांच्या आयुष्यावर चित्रपट बनवायचा होता. साहजिकच त्यांना त्यांच्या कुटुंबापेक्षा चांगले कोण ओळखणार. आम्ही लवकरच आमच्या कुटुंबातील सदस्यांच्या मुलाखतींचे शूटिंग सुरू करू.'

स्क्रिप्ट तयार होण्यासाठी एक वर्ष लागेल

अमित म्हणतो, “आम्हाला माहित आहे की चित्रपटाची स्क्रिप्ट तयार होण्यास किमान एक वर्ष लागेल. यासाठी एक मोठा प्रवास आणि मेहनत घ्यावी लागेल.'

अमित कुमारपूर्वी अनुराग बसू आणि सुजीत सरकार यांना किशोर कुमार यांच्या जीवन प्रवासावर बायोपिक बनवायचा होता. चार वर्षांपूर्वी अनुराग यांनीही चित्रपटाची तयारी सुरू केली होती, ज्यामध्ये त्यांना रणबीर कपूरला कास्ट करायचे होते, पण आता कायदेशीर अडचणींमुळे हा चित्रपट थांबला आहे.

आयुष्मान खुरानाला साकारायची आहे किशोर कुमार यांची भूमिका
काही वर्षांपूर्वी जेव्हा अनुराग बसू रणबीर कपूरसोबत किशोर कुमार यांचा बायोपिक बनवत असल्याची बातमी आली तेव्हा आयुष्मान खुरानाने हा चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आयुष्मान एका मुलाखतीत म्हणाला होता, 'जर कोणी किशोर कुमारचा बायोपिक बनवत असेल तर कृपया मला या चित्रपटात मुख्य भूमिका द्या. हे पात्र साकारण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे. मीही गाणे गातो.' किशोर कुमार यांच्या कुटुंबीयांकडून तयार होणाऱ्या चित्रपटात कोण मुख्य भूमिकेत दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

बातम्या आणखी आहेत...