आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लता मंगेशकर हेल्थ अपडेट:ब्रीच कँडीचे डॉ. प्रतीत समधानी म्हणाले – लता मंगेशकर अजूनही ICUमध्ये आहेत, परंतु त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होतेय

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या काही वर्षांपासून प्रतीत समधानी करत आहेत त्यांच्यावर उपचार

'गानकोकिळा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीत समधानी यांनी दिली आहे. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतरही त्यांना काही दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

त्यांच्या तब्येतीत आता थोडीशी सुधारणा झाली आहे: प्रतीत समधानी
डॉ. प्रतीत समधानी यांनी एएनआयला सांगितले की, "गायिका लता मंगेशकर अजूनही आयसीयू वॉर्डमध्ये दाखल आहेत, परंतु त्यांच्या प्रकृतीत आता थोडी सुधारणा झाली आहे. त्यांनी पुढे सांगितल्यानुसार, लतावर डॉक्टरांची सर्वोत्कृष्ट टीम उपचार करत आहे. त्या ब-या होत असली तरी त्यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू दिले जात नाहीये. त्यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाचाही त्रास आहे. त्यामुळे त्यांना पुढील 10-12 दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून प्रतीत समधानी करत आहेत त्यांच्यावर उपचार
लता मंगेशकर यांच्यावर गेल्या काही वर्षांपासून डॉ. प्रतीत समधानी हे उपचार करत आहेत. 92 वर्षीय लता दीदी यांना दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये श्वासोच्छवासाचा त्रास आणि न्यूमोनियामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्या 28 दिवस रुग्णालयात होत्या.

कोरोनावर मात करुन त्या लवकरच घरी परततील
यापूर्वी लता मंगेशकर यांची भाची रचना शहा यांनी दीदींच्या प्रकृती विषयी माहिती दिली होती. ‘लतादीदी यांना कोविड-19 ची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. पण त्यांची प्रकृती आणि वय लक्षात घेता खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यावर डॉक्टरांची सर्वोत्कृष्ट टीम उपचार करत आहे. लतादीदी या सध्या ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. पुढील काही दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. त्या लवकरच कोरोनावर मात करुन घरी परततील.’ लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मंगळवारी फोन केला होता.

घरातील कर्मचाऱ्यामुळे लता मंगेशकर यांना झाली कोरोनाची लागण
लता मंगेशकर यांच्या 'एलएम म्युझिक' या म्युझिक लेबलचे सीईओ मयुरेश पै यांनी दिव्य मराठीसोबतच्या खास बातचीतमध्ये सांगितले की, घरात काम करणारे कर्मचारी सामान आणण्यासाठी बाहेर पडत असतात. त्यापैकी एका कर्मचार्‍याला संसर्ग झाला होता. लता दीदी त्याच्या संपर्कात आल्या होत्या, त्यामुळे त्यांची कोविड चाचणी करण्यात आली, ज्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

मयुरेश पै यांनी पुढे सांगितले की, लता दीदींच्या कुटुंबातील त्यांची बहीण उषा मंगेशकर आणि भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह कोणत्याही सदस्याला कोरोना झाला नाही. मुंबईतील पॅडर रोडस्थित निवासस्थानी लता दीदी त्यांच्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. 2019 पासून त्या घराबाहेर पडल्या नाहीत. त्या कुणाला भेटतदेखील नाहीत.