आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वर कोकिळा लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. 6 फेब्रुवारी रोजी वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये त्यांचे अस्थि विसर्जन करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी त्यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर, भाची रचना आणि भाचा आदिनाथ यांनी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे जाऊन अरबी समुद्रात त्यांचा अस्थिकलश विसर्जित केला. यावेळी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते.
यामुळे मुंबईच्या समुद्रात करण्यात आले अस्थिकलशाचे विसर्जन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांचे मुंबईवर खूप प्रेम होते. त्यामुळे त्यांच्या अस्थिकलशाचे मुंबईच्या समुद्रात विसर्जन होणेच योग्य आहे, असे त्यांच्या कुटुंबीयांना वाटले. ज्या दिवशी दीदींचे निधन झाले, त्याच दिवशी त्यांच्या कुटुंबीयांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
नाशिक, हरिद्वार आणि वाराणसी येथेही अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात आले
10 फेब्रुवारी रोजी नाशिकच्या पवित्र गोदावरी नदीत भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले होते. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब नाशिकमध्ये उपस्थित होते. नाशिक जिल्हा प्रशासनानेही गोदावरी नदीच्या काठावर संपूर्ण व्यवस्था केली होती. लता दीदींवर मुंबईतील शिवाजी पार्कवर अंत्य संस्कार करण्यात आले होते. त्यानंतर दुस-या दिवशी लता मंगेशकर यांच्या अस्थी तीन कलशांमध्ये त्यांच्या कुटुंबांकडे सुपूर्द करण्यात आल्या. हृदयनाथ मंगेशकर यांचा मुलगा आदिनाथ मंगेशकर हे लतादीदी यांच्या अस्थी घेऊन प्रभुकुंजवर दाखल झाले होते.
10 फेब्रुवारी रोजी लता दीदींच्या अस्थींचे नाशिकच्या पवित्र रामकुंडात अस्थींचे विसर्जन करण्यात आले. नाशिकमधील रामकुंडव्यतिरिक्त त्यांचा अस्थिकलश हरिद्वार आणि वाराणसीलाही नेण्यात आला होता.
लता दीदींवर शासकीय इतमामात करण्यात आले होते अंत्यसंस्कार
लता मंगेशकर यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. यानंतर लतादीदींवर मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर आणि भाचा आदिनाथ यांनी त्यांना मुखाग्नी दिला होता. दीदींना 8 जानेवारी रोजी कोरोना आणि न्यूमोनियामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, आमिर खान, रणबीर कपूर, शंकर महादेवन, संजय लीला भन्साळी, जावेद अख्तर, श्रद्धा कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आणि चाहते लतादीदींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.