आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्गज तेलुगू अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक:श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे ज्येष्ठ अभिनेते कैकला सत्यनारायण रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉक्टर सांगितले - कैकला यांची प्रकृती चिंताजनक

प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेते कैकला सत्यनारायण हे गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहेत. 1 नोव्हेंबर रोजी त्यांना सिकंदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु रविवारी त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना हैदराबाद येथील अपोलो रुग्णालयात हलविण्यात आले.

ऑक्टोबरमध्ये कैकला सत्यनारायण त्यांच्या बाथरूममध्ये घसरुन पडले होते. त्यामुळे त्यांना दुखापत झाली होती. चार दिवसांनंतर, 1 नोव्हेंबर रोजी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, त्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. आता शुक्रवारपासून त्यांची प्रकृती खालावली आहे.

डॉक्टर सांगितले - कैकला यांची प्रकृती चिंताजनक
काही दिवसांपूर्वी कैकला यांना कोविडची लक्षणे दिसून आली होती, मात्र त्यावेळी डॉक्टरांनी कुटुंबीयांना घाबरण्याचे कारण नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.

पौराणिक अभिनेते कैकला सत्यनारायण हे टॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहेत, त्यांनी 700 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते शेवटचे 2009 मध्ये महेश बाबू स्टारर 'महर्षी' आणि 2019 च्या NTR कथानायकुडू या चित्रपटात दिसले होते.

बातम्या आणखी आहेत...