आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड कनेक्शन:मॉडेलिंगमध्ये यशस्वी झाल्यानंतर चित्रपटांमध्ये आला होता अर्जुन रामपाल, 19 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये दाखवू शकला नाही फारशी कमाल

मुंबईएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • अर्जुन रामपाल शाहरुख खानला ड्रग्ज पुरवत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एनसीबीच्या चौकशीत ड्रग्ज पेडलर्सनी बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्यांची नावे घेतली आहेत. शाहरुख खान, अर्जुन रामपाल आणि डिनो मोरिया ही ती नावे आहेत. मोठी बातमी म्हणजे अर्जुन रामपाल शाहरुख खानला ड्रग्ज पुरवत होता. ही बाब उघड होताच अर्जुन चर्चेत आला आहे. चला जाणून घेऊया त्याच्या आयुष्याशी संबंधित काही फॅक्ट्स…

 • अर्जुनचा जन्म 26 नोव्हेंबर 1972 रोजी जबलपुर येथे झाला होता. तो मिलिट्री पार्श्वभूमीच्या कुटुंबातील आहे. त्याचे आजोबा (आईचे वडील) ब्रिगेडिअर गुरदयाल सिंग यांनी भारतीय सैन्यासाठी पहिली आर्टिलरी गन बनवली होती.
 • अर्जुनच्या बालपणीच त्याच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर आईला अर्जुनला ताबा मिळाला. त्याची आई शिक्षिका होती.
 • अर्जुनने दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन केली.

मॉडेलिंगमध्ये कमावले नाव

 • बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अर्जुन एक यशस्वी मॉडेल होता. लोकप्रिय फॅशन डिझायनर रोहित बालने अर्जुनला एका पार्टीत पाहिले होते आणि त्याच्या लूकमुळे तो प्रभावित झाला होता. अर्जुनचे मॉडेलिंग करिअर पुढे नेण्यास रोहितने मदत केली होती.
 • 1994 मध्ये अर्जुनला मॉडेलिंगमध्ये सोसायटी फेस ऑफ दि इयर अवॉर्ड मिळाला होता.
 • 2001 मध्ये अर्जुनने 'प्यार इश्क और मोहब्बत' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटासाठी अर्जुनला अनेक डेब्यू पुरस्कार मिळाले. 2008 मध्ये त्याला 'रॉक ऑन'साठी राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले.
 • 'मोहब्बतें'मध्ये काम करणारी किम शर्माचा अर्जुन कजिन आहे.
 • अर्जुन रामपाल 2004 मध्ये आलेल्या 'लक्ष्य'साठी पहिली पसंत होता, परंतु तारखा नसल्यामुळे त्याला हा चित्रपट करता आला नाही आणि त्यानंतर हृतिक रोशनला या चित्रपटात कास्ट करण्यात आले.

आघाडीच्या मॉडेलसोबत केले होते लग्न

 • अर्जुनने 1998 मध्ये सुपर मॉडेल मेहर जेसियाशी लग्न केले होते. त्यांना महिका आणि मायरा या दोन मुली आहेत. महिकाचा जन्म 2002 मध्ये झाला होता तर मायराचा जन्म 2005 मध्ये झाला. अर्जुन-मेहरचे लग्न फक्त 10 वर्षे टिकले, दोघांचा 2018 मध्ये घटस्फोट झाला.

 • घटस्फोटानंतर अर्जुन दक्षिण आफ्रिकेची मॉडेेल गॅब्रिएलासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे. 18 जुलै 2019 रोजी या दोघांना मुलगा झाला असून एरिक हे त्याचे नाव आहे.

चित्रपटांमध्ये फारशी कमाल दाखवू शकला नाही

 • अर्जुन अखेरचा जेपी दत्तांच्या 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'पलटन' या चित्रपटात दिसला होता. त्याचा आगामी चित्रपट 'नेल पॉलिश' असून तो 2021 मध्ये प्रदर्शित होईल.
 • अर्जुनच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास मॉडेलिंगमध्ये त्याने बरीच प्रसिद्धी मिळवली पण 19 वर्षे बॉलिवूडमध्ये व्यतीत करूनही त्याला फारशी कमाल दाखवता आली नाही.
 • 'मोक्ष', 'दिवानापन', 'दिल का रिश्ता', 'असंभव', 'एक अजनबी' हे त्याचे चित्रपट फ्लॉप ठरले. 'रा.वन', 'हिरोईन', 'डी-डे', 'रॉय', 'डॅडी' देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकले नाहीत.