आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणीतील राजीव कपूर:बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरले होते ऋषी-रणधीरचे भाऊ राजीव कपूर, लग्नाच्या दोन वर्षांतच झाला होता घटस्फोट

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 25 ऑगस्ट 1962 मध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपूर घराण्यात त्यांचा जन्म झाला होता.

बॉलिवूडचे मोठे घराणे म्हणून ओळखल्या जाणा-या कपूर घराण्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राज कपूर यांचे पुत्र राजीव कपूर यांचे आज (9 फेब्रुवारी) निधन झाले आहे. राजीव कपूर हे रणधीर कपूर आणि दिवंगत ऋषी कपूर यांचे धाकटे भाऊ होते. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राजीव यांची प्राणज्योत मालवली. ते 58 वर्षांचे होते.

आईवडील आणि भावांसोबतचा राजीव कपूर यांचा एक जुना फोटो
आईवडील आणि भावांसोबतचा राजीव कपूर यांचा एक जुना फोटो

25 ऑगस्ट 1962 मध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपूर घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. यशस्वी फॅमिलीतून असूनदेखील राजीव सिनेमांमध्ये मात्र यश मिळवू शकले नव्हते. त्यांनी जवळपास दहा हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केला. यापैकी मोजके सिनेमे बॉक्स ऑफिसवर चालले.

त्यांचा 1985 मध्ये रिलीज झालेला 'राम तेरी गंगा मैली' हा सिनेमा बराच गाजला होता. मात्र पुढे त्यांच्या अभिनय करिअरची गाडी रुळावरुन घसरली. अभिनयात अपयश हाती आल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्राकडे वळवला होता.

बहीण रीमा जैनचा मुलगा अरमानसह राजीव कपूर
बहीण रीमा जैनचा मुलगा अरमानसह राजीव कपूर

निर्माता म्हणून...

  • हिना- 1991- एग्झिक्यूटिव्ह प्रोड्यूसर
  • प्रेमग्रंथ- 1996- एग्झिक्यूटिव्ह प्रोड्यूसर
  • आ अब लौट चलें- 1999- प्रोड्यूसर
आई आणि बहीणभावंडांसोबत राजीव कपूर
आई आणि बहीणभावंडांसोबत राजीव कपूर

दिग्दर्शक म्हणून...

  • प्रेम रोग- 1982- असिस्टंट/यूनिट डायरेक्टर
  • बीवी ओ बीवी- 1981- असिस्टंट/यूनिट डायरेक्टर
  • प्रेमग्रंथ- 1996- डायरेक्टर
आई कृष्णा कपूरसह राजीव कपूर
आई कृष्णा कपूरसह राजीव कपूर

एडीटर म्हणून...

  • प्रेमग्रंथ- 1996
  • आ अब लौट चलें- 1999

लग्न ठरले अपयशी
1999 पासून राजीव सिनेसृष्टीपासून दूर होते. 2001 मध्ये वयाच्या 39 च्या वर्षी त्यांनी आर्किटेक्ट आरती सभरवालसह लग्न केले होते, मात्र लग्नाच्या दोन वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला होता.

बातम्या आणखी आहेत...