आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अॅडल्ट स्टार शकीला हिच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाने शकीलाची भूमिका वठवली असून तिच्यासह पंकज त्रिपाठी एका महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. येत्या 25 डिसेंबर रोजी हिंदीसह तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेत 1000 स्क्रिन्सवर हा चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने जाणून घेऊयात कोण आहे शकीला..
अॅडल्ट चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या शकीलाने वयाच्या 20 व्या वर्षी 'प्लेगर्ल्स' (1995) या सॉफ्ट पोर्न चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. प्रसिद्ध झाल्यानंतर शकीलाने तिच्या ऑटोबायोग्राफीत लिहिले, "माझ्या आईशी निगडीत एकही चांगली आठवण माझ्याजवळ नाहीये. तिने माझे संपूर्ण आयुष्य उद्धवस्त केले. बालपणी एका व्यक्तीने माझ्यावर बलात्कार केला होता. त्याने माझ्या आईच्या परवानगीने माझ्यावर बलात्कार केला होता. त्या मोबदल्यात माझ्या आईला त्याने पैसे दिले होते."
नाईलाजाने सेक्स वर्कर बनली होती शकीला
बायोग्राफीत शकीलाने सांगितल्यानंतर, ती वयाच्या 18 व्या वर्षी सेक्स वर्कर बनली होती. असे तिने तिच्या आईच्या सांगण्यावरुन केले होते. घरात पैसे यावे, यासाठी आईनेच वेश्या व्यवसायात ढकल्याचे शकीलाने तिच्या बायोग्राफीत सांगितले आहे. शकीलाला नाईलाजाने सेक्स वर्कर व्हावे लागले. चेन्नईत जन्मलेल्या शकीलाचे बालपण अतिशय गरीबीत गेले. ती फक्त सहाव्या वर्गापर्यंत शिकू शकली. अभ्यासात ती हुशार नव्हती. पण कॉन्व्हेंट शाळेत शिकल्याने तिचे इंग्रजी चांगले होते. सहा बहीण भाऊ आणि आईच्या उदरनिर्वाहासाठी तिने अॅडल्ट चित्रपटांमध्ये काम सुरु केले होते.
करिअरच्या सुरुवातीच्या काळात फुकटात केले होते काम
चित्रपटात करिअर सुरु करताना फुकटात काम केल्याचे शकीला सांगते. ती म्हणते, 'माझ्याजवळ सुंदर शरीराव्यतिरिक्त काही नव्हते. कुणीही माझ्यातील टॅलेंट आणि अभिनेत्रीला बाहेर आणण्याचा प्रयत्न केला नाही. त्याकाळात सॉफ्ट पोर्न चित्रपटांना सेक्स एज्युकेशन चित्रपट म्हटले जायचे. मी चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. करिअरच्या सुरुवातीच्या काळात मला चित्रपटांमध्ये फ्रीमध्ये काम करावे लागले होते. '
सिल्क स्मिताला आयडॉल मानते शकीला
सुमारे 250 चित्रपटांमध्ये झळकलेल्या शकीलाने 'प्लेगर्ल' या पहिल्या चित्रपटात साऊथ अॅक्ट्रेस सिल्क स्मिताच्या छोट्या बहिणीची भूमिका साकारली होती. सिल्क स्मिताला शकीला आयडॉल मानते. सिल्कनेही साऊथच्या अनेक अॅडल्ट चित्रपटांमध्ये काम केले. सिल्कच्या आयुष्यावर बेतलेल्या द डर्टी पिक्चरमध्ये अभिनेत्री विद्या बालनने तिची भूमिका वठवली होती.
शकीलाच्या चित्रपटांना घाबरतात इतर निर्माते
सुमारे 20 वर्षे फिल्म इंडस्ट्रीत काम करणारी शकीला हळूहळू इंडस्ट्रीत प्रसिद्ध झाली. तिला बिग बजेटचे चित्रपट ऑफऱ होऊ लागले. 'शकीला प्रॉडक्शन' नावाने तिने स्वतःचे प्रॉडक्शन हाऊसदेखील सुरु केले आहे. आता अनेक निर्माते त्यांचे चित्रपट शकीलाच्या चित्रपटांच्या जवळपास चित्रपट रिलीज करायला घाबरतात. शकीलाचे चित्रपट फक्त भारतीयच नव्हे तर चायनीज, नेपाळी आणि इतर भाषांमध्येही डब केले जातात.
48 वर्षीय शकीलाने अद्याप केले नाही लग्न....
एका मुलाखतीत शकीलाने सांगितले होते की, करिअर पीकवर पोहोचल्यानंतर सुमारे 100 हून अधिक अभिनेते आणि मेकर्स तिच्याकडे लग्नाचे प्रपोजल घेऊन आले होते. शकीलाचे नाव अनेक फिल्मी सेलिब्रिटीजसोबत जुळले. पण 48 वर्षीय शकीलाने अद्याप लग्न केले नाही. शकीलाला कायम हाऊसवाईफचे आयुष्य जगायची इच्छा होती, पण नशीब तिला दुसरीकडेच घेऊन गेले.
शकीलाने शाहरुखच्या 'चेन्नई एक्स्प्रेस'ला दिला होता नकार
शकीलाने चित्रपटसृष्टीपासून आता संन्यास घेतला आहे. मात्र 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या 'चेन्नई एक्स्प्रेस'मध्ये तिला दीपिका पदुकोणच्या आईची भूमिका ऑफर झाली होती. या भूमिकेसाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी तिला डायरेक्ट अप्रोच केले नव्हते, तर त्याच्या टीमने शकीलाशी संपर्क केला होता. शिवाय या भूमिकेसाठी तिला फक्त 25 हजार रुपये दिले जाणार होते. त्यामुळे तिने या चित्रपटाला नकार दिला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.