आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Life Of The Most Expensive Contestant Radhe Maa Of 'Bigg Boss 14' Full Of Controversy, Dolly Bindra Filed A Case Of Physical Abuse In 2015

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादात सापडली आहे राधे माँ:'बिग बॉस 14'ची सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक आहे राधे माँ, वादग्रस्त आहे खासगी आयुष्य, 2015 मध्ये डॉली बिंद्राने लैंगिक शोषणाची दाखल केली होती तक्रार

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राधे माँ यंदाच्या पर्वातील सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक आहे.

स्वयंघोषित देवी राधे माँ टीव्हीवरील वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉसच्या 14 व्या पर्वात सहभागी होत आहे. अलीकडेच चॅनलेने राधे माँची पहिली झलकदेखील शेअर केली आहे. बातम्यांनुसार राधे माँ यंदाच्या पर्वातील सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक आहे.

बॉलिवूड लाइफच्या वृत्तानुसार, राधे माँ उर्फ ​​सुखविंदर कौरला या कार्यक्रमासाठी दर आठवड्याला 25 लाख रुपये फी दिली जाईल. एवढे मानधन घेणारी ती या पर्वातील एकमेव स्पर्धक आहे. तर काही बातम्यांनुसार, ती बिग बॉसच्या घरात फक्त एकच आठवडा राहणार आहे.

राधे माँ या वादांमुळे चर्चेत राहिली

  • बिग बॉस 4 मध्ये दिसलेली डॉली बिंद्रा ही राधे माँची भक्त होती. मात्र 2015 मध्ये डॉली बिंद्राने राधे माँ आणि तिच्या काही भक्तांविरोधात मालाड पोलिस स्टेशनमध्ये लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती. डॉलेने आपल्या तक्रारीत म्हटले होते की, राधे माँ तिला आपल्याबरोबर चंदीगड येथील पोलिस अधिका-याच्या घरी घेऊन गेली होती. जिथे तिने तिच्यावर एका अज्ञात व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणतला होता. वन इंडियाच्या वृत्तानुसार ती अज्ञात व्यक्ती म्हणजे टल्ली बाबा नावाची व्यक्ती होती जो राधे माँबरोबर काम करायची.
  • आपल्या तक्रारीत डॉलीने राधे माँवरही आरोप करत म्हटले होते की, तिच्या काही भक्तांनी सर्वांसमोर आपल्याशी गैरवर्तन केले होते. राधे माँच्या मुलाने डॉलीसमोर आपले कपडे काढले होते, असेही डॉली बिंद्राने तक्रारीत म्हटले होते. ऑगस्ट 2016 मध्ये राधे माँचे काही भक्त धमकावत असल्याचा खुलासादेखील डॉली बिंद्राने केला होता.
  • स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, मुंबई येथील व्यावसायिक संजय गुप्ताच्या मुलीने राधे माँ आणि तिच्या सासरच्या लोकांविरोधात हुंड्यासाठी छळ आणि घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होची. हे सर्व करण्यासाठी राधे माँ आपल्या सासूला भडकवते असा आरोप या महिलेने केला होता.
  • 2015 मध्ये राधे माँची अधिकृत वेबसाइट हॅक झाली होती. हॅकरने आपल्या वेबसाइटवर राधे माँची काही वादग्रस्त छायाचित्रे शेअर केली होती, ज्यात ती मिनी स्कर्ट आणि बूट परिधान करून बरीच बोल्ड दिसली होती. छायाचित्रांमध्ये सुखविंदर कौर उर्फ ​​राधे मां दोन जणांना आपल्या मोहात पाडताना दिसली होती.
2015 मध्ये राधे माँचे हे फोटो व्हायरल झाले होते.
2015 मध्ये राधे माँचे हे फोटो व्हायरल झाले होते.

राधे माँ पूर्वी स्वामी ओमही बिग बॉस 10 चा भाग बनले आहेत. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे ढोंगी बाबा चर्चेत आले होते. आता दीर्घकाळानंतर पुन्हा एकदा अशा व्यक्तिमत्त्वाला शोमध्ये पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...