आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय देवरकोंडाच्या 'लायगर'मधील 'आफत' साँग रिलीज:तनिष्क बागचीने केले कंपोज; एका तासात मिळाले 5 लाख व्ह्यूज

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा गाण्याचा संपूर्ण व्हिडिओ -

विजय देवरकोंडा स्टारर 'लायगर' या चित्रपटातील 'आफत' हे दुसरे गाणे रिलीज झाले आहे. तनिष्क बागची यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. यूट्यूबवर हे गाणे रिलीज होताच एका तासात जवळजवळ 5.52 लाख लोकांनी हे गाणे पाहिले. तर आतापर्यंत हा आकडा वाढून 18 लाखांपर्यंत पोहोचला आहे. या गाण्यात विजय आणि अनन्या पांडे यांची रोमँटिक केमिस्ट्री लक्ष वेधून घेतेय. या चित्रपटाचा निर्माता करण जोहरनेही इंस्टाग्रामवर गाण्याची झलक शेअर केलीये.

या चित्रपटात विजय व्यतिरिक्त अनन्या पांडे आणि माइक टायसन देखील दिसत आहेत.

बघा गाण्याचा संपूर्ण व्हिडिओ -

किक बॉक्सरच्या भूमिकेत विजय हॉलिवूडपटाला तोड देणारा असा हा चित्रपट आहे. यात विजयने किक बॉक्सरची भूमिका वठवली आहे. अ‍ॅक्शन, ड्रामा, रोमान्सचा तडका या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना अनुभवता येतोय.

या स्पोर्ट्स ड्रामामध्ये विजय देवरकोंडा यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद या ठिकाणी चित्रपटाचे शूटिंग झाले आहे. ‘लायगर’ची सिनेमॅटोग्राफी विष्णू सरमा यांनी केली आहे. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजय आणि अनन्याशिवाय मकरंद देशपांडे, अमेरिकन किक बॉक्स माइक टायसन, रम्या कृष्णन, रोनित रॉय, विष्णू रेड्डी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. करण जोहर आणि अपूर्व मेहता या चित्रपटाचे निर्माते आहेत. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होतोय.

बातम्या आणखी आहेत...