आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
25 एप्रिल 2021 ला लॉस एंजिलिस येथे होणा-या 93 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये 'जल्लीकट्टू' या मल्याळम चित्रपट भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या 14 सदस्यांच्या समितीने दिग्दर्शक लिजो जोस पेलिसरी यांच्या या चित्रपटाची निवड केली आहे. 'जल्लीकट्टू' या चित्रपटाची निवड सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म फॉरेन लँग्वेज कॅटेगरीत भारताच्या वतीने करण्यात आली आहे.
जल्लीकट्टूवर देशाला अभिमान वाटला पाहिजे - राहुल
फेडरेशनचे ज्युरी बोर्डाचे अध्यक्ष राहुल रावले यांनी घोषणा करताना म्हटले, “हा असा चित्रपट आहे जो मनुष्यांमध्ये असलेल्या समस्या दर्शवतो. पेलिसरी एक अत्यंत सक्षम दिग्दर्शक आहेत. अंगमाली डायरीज, इआ, मा याऊ यासाठी त्यांना ओळखले जाते. त्यांचा जल्लीकट्टू असा चित्रपट आहे ज्यावर देशाला अभिमान असायला हवा."
'जल्लीकट्टू'ची 27 चित्रपटांमधून झाली निवड
हिंदी, उडिया, मराठी आणि अन्य भाषांमधील एकूण 27 चित्रपटांमध्ये 93 व्या अकादमी पुरस्कारांसाठी स्पर्धा होती. यामध्ये शुजित सरकार यांचा 'गुलाबो सीताबो', सफदर रहाना यांचा 'चिप्पा', हंसल मेहतांचा 'छलांग', चैतन्य ताम्हाणेंचा 'द डिसाइपल', विधु विनोद चोप्रांचा 'शिकारा', अनंत महादेवन यांचा 'बिटरस्वीट', रोहेना गगेरांचा 'इज लव्ह इनफ सर', गीतू मोहनदास यांचा 'मुथॉन', नीला माधव पांडा यांचा 'कलिरा अतिता', अनविता दत्त यांचा 'बुलबुल', हार्दिक मेहता यांच्या 'कामयाब' आणि सत्यांशू-देवांशू यांच्या 'चिंटू का बर्थडे' या चित्रपटांचा समावेश होता.
केरळमधील खेळावर आधारित हा चित्रपट आहे
ऑस्करसाठी पाठवलेला जल्लीकट्टू हा चित्रपट केरळच्या इडुक्की जिल्ह्यातल्या जल्लीकट्टू या वादग्रस्त खेळावर आधारित आहे. ज्यामध्ये बैल ठार मारण्यापूर्वी गर्दीत सोडला जातो. जल्लीकट्टू चित्रपटाचा प्रीमियर सप्टेंबर 2019 मध्ये टोरंटो फिल्म फेस्टिव्हल दरम्यान झाला होता. चित्रपटाची कथा माओवादी हरीशच्या लघुकथेवर आधारित आहे. ज्यामध्ये अँटनी वर्गीश, चेम्बन विनोद जोस, साबुमन अब्दसमद आणि सैंथी बालाचंद्रन यांनी भूमिका साकारल्या आहेत.
फॉरेन लँग्वेज कॅटेगरीत अद्याप मिळाला नाही ऑस्कर
2019 मध्ये झोया अख्तरच्या 'गली बॉय'ची 2020 च्या 92 व्या अकादमी पुरस्कारासाठी निवड झाली होती. यापूर्वी, रीमा दास यांचा 'व्हिलेज रॉकस्टार्स', अमित मसुरकर यांचा 'न्यूटन', वेत्री मारन यांचा 'विसारानई' आणि चैतन्य ताम्हाणे यांच्या 'कोर्ट' या चित्रपटाने फॉरेन लँग्वेज कॅटेगरीत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही भारतीय चित्रपटाने या श्रेणीत ऑस्कर जिंकलेला नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.