आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन इफेक्ट:अटींवर पुन्हा चित्रीकरण सुरू करण्याची निर्मात्यांची मागणी, लॉकडाऊन संपल्यानंतर 'हे' होऊ शकते

मुंबई (अमित कर्ण)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • छोट्या बजेटच्या चित्रपटाला जास्त प्राथमिकता दिली जाईल. विचारविनिमय करूनच बजेट मान्य होईल.

लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टीला कोट्यवधींचे नुकसान झाले. ते संपल्यानंतरदेखील या वर्षाच्या अखेरपर्यंत चित्रपटांच्या चित्रीकरणावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. बरेच निर्माते आपापसात चर्चा करत असून यावर काही उपाययोजना करता येईल का, याचा विचार करत आहेत.

निर्माते गिल्ड यांच्या मते, एका चित्रपटावर दीडशे ते दोनशे लोकांचे कुटुंब चालते. दोन मुख्य कलाकारांना सोडले तर टेक्निशियन, स्पॉटबॉय, लाइटमॅनसारख्यांसमोर या लॉकडाऊननंतर जगण्याचे मोठे संकट आहे. निर्माते मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. 60-70 लोकांसोबत चित्रीकरणाची परवानगी मिळू शकते का? यासाठी अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे.

सेटवर जाण्यापूर्वी प्रत्येक सदस्याची कोरोना तपासणी होणार आणि सेटवर सर्व दक्षताही घेतली जाणार. यासंबंधी आखणीही होत आहे. या चर्चेतून काय निष्पन्न होणार याची वाट पाहावी लागेल.

लॉकडाऊन संपल्यानंतर हे होऊ शकते

  • लॉकडाऊन संपल्यानंतर सुरुवातीच्या काळात नक्कीच मोठ्या बजेटचे चित्रपट बनवणार नाही, कारण त्यांना मान्यताच मिळणार नाही.
  • छोट्या बजेटच्या चित्रपटाला जास्त प्राथमिकता दिली जाईल. विचारविनिमय करूनच बजेट मान्य होईल.
  • लेखक पुन्हा नवीन कथानक लिहितील. ज्याचे चित्रीकरण कमी क्रू मेंबर्ससोबत सहज करता येईल.

मुंबईतील बऱ्याच भागात चित्रीकरण झालेच नाही - लारा दत्ता, अभिनेत्री

‘येणाऱ्या काळात जी स्क्रिप्ट्स लिहिली जाईल त्याचे लोकेशन मुंबईच असेल, हे तर निश्चित आहे. अलीकडेच आलेला माझा वेब शो ‘हंड्रेड’चे संपूर्ण चित्रीकरण मुंबईत झाले आहे. मी 20 वर्षांपासून मुंबईत आहे. या शोचे चित्रीकरण ज्या लोकेशनवर झाले होते ते मी आजपर्यंत पाहिलेच नव्हते.

 

कमी लोकेशन्स आणि कमी पात्रांना मागणी - ज्योति कपूर, लेखक

‘लॉकडाऊनमुळे लेखकांच्या समोर लक्ष्मणरेषा आखली गेली आहे. कमी पात्रे असलेले कथानक लिहिण्याची मागणी केली जात आहे. शिवाय लोकशन पाहून कथानक लिहावे लागत आहे. गर्दी नसलेल्या भागात चित्रीकरण करता यावे अशा जागेची मागणी निर्माते करत आहे. या अटी पाहता आपल्याला नावीन्यपूर्ण व्हावे लागेले बऱ्याच नवीन कल्पना आणाव्या लागतील, कारण जगच आता बदलत आहे. 

बातम्या आणखी आहेत...