आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाईच्या 'राधे'ची क्रेझ ओसरली की काय?:पहिल्या दिवशी 4.2 मिलियन व्युअरशिपनंतर निगेटिव्ह पब्लिसिटीमुळे चित्रपटाला नुकसान, परदेशात केवळ 15 कोटींचा व्यवसाय

मनीषा भल्ला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पे पर व्ह्यू मॉडेलला भारतात चांगले दिवस आले की नाही, याबाबत तज्ज्ञांचे एकमत नाही.

सलमान खानच्या 'राधे: योर मोस्ट वाँटेड भाई' या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्म झी -5 चा दावा आहे की, पहिल्या दिवशी राधेला 4.2 मिलियन व्युअरशिप मिळाली. म्हणजे पहिल्याच दिवशी तब्बल 42 लाख लोकांनी हा चित्रपट पाहिला, जो एक विक्रम आहे. परंतु आता या चित्रपटाला निगेटिव्ह पब्लिसिटीमुळे नुकसान सहन करावे लागू शकते.

झी 5 ने अद्याप राधेच्या पे पर व्ह्यू मॉडेलचा किती फायदा झाला आणि किती नवीन ग्राहक जोडले गेले याविषयीच्या आकडेवारीबाबत कोणतेही अधिकृत विधान जाहीर केलेले नाही. विदेशात राधे चांगली कमाई करत आहे, परंतु 4 महिन्यांपूर्वीचा तमिळ चित्रपट 'मास्टर' किंवा सलमानचा मागील चित्रपट 'दबंग 3' च्या तुलनेत राधे खूप मागे पडला आहे.

इतकेच नाही तर 'राधे' पायरेसीचा बळी पडला आहे. ओटीटीवर येण्याच्या काही तासांतच हा चित्रपट लीक झाला. त्यामुळेही झी 5 ला तोटा सहन करावा लागतोय.

परदेशात राधेची कमाई 'दबंग -3' पेक्षा कमी
ऑस्ट्रेलियामध्ये 67 स्क्रीनवर राधे हा चित्रपट रिलीज झाला आहे. तर न्यूझीलंडमध्ये 28 स्क्रीनवर झळकला आहे. व्यापाराशी संबंधित सूत्रांनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात आतापर्यंत राधेचे एकुण कलेक्सन 15 कोटी इतके आहे. तर सलमानच्याच दबंग 3 चे एकूण ओव्हरसीज कलेक्शन 80 लाख यूएस डॉलर म्हणजे 60 कोटी इतके होते.

युएईमध्ये 'राधे'च्या पुढे' मास्टर'
युएईमध्ये थिएटर सध्या 50 टक्के प्रेक्षक क्षमतेवर सुरु झाले आहेत. तिथे राधेने 10 लाख यूएस डॉलर (7.5 कोटी रुपये) चा व्यवसाय केला आहे. येथे पहिल्या आठवड्याच्या शेवटी तामिळ चित्रपट मास्टरने 13 लाख यूएस डॉलर (9.52 कोटी रुपये) चा व्यवसाय केला होता. मास्टर हा चित्रपट याचवर्षी पोंगलच्या निमित्ताने रिलीज झाला होता.

पे पर व्ह्यू मॉडेल हिट की फ्लॉप
भारतात, राधे हा पहिला मोठा चित्रपट आहे, जो ‘पे पर व्ह्यू’ मॉडेल अंतर्गत प्रदर्शित झाला. राधेमुळे भारतात पे पर व्ह्यू या मॉडेलला चांगले दिवस आलेत की नाही याबाबत विश्लेषकांचे मत भिन्न आहे.

व्यापार विश्लेषक अतुल मोहन यांनी भास्करला सांगितले की, जगात एकाच वेळी थिएटर्स बंद होतील याची कल्पनाही कोणी केली नव्हती. अशा परिस्थितीत गॉडजिला व्हर्सेस कोंग, वंडर वूमन आणि टेनेंट हे चित्रपट पे पर व्ह्यू सेवेअंतर्गत प्रदर्शित झाले. पे पर व्ह्यू मॉडेल हे पाश्चात्य देशांमध्ये कार्यरत आहे. जर भारतात अशी परिस्थिती राहिली तर तर हे सूत्र पुढे जाईल कारण आता चित्रपट म्हणजे क्रेझ नव्हे तर व्यवसाय आहे. कोणीही आपला बिझनेस जास्त काळ होल्ड करणार नाही.

व्यापार विश्लेषक राहुल व्ही. दुबे यांच्या मते, जोपर्यंत भारतात पायरसी आहे, तोपर्यंत पे पर व्ह्यू मॉडेल यशस्वी होणार नाही. सध्या राधे बर्‍याच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विनामूल्य उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, अधिक लोक पे पर व्ह्यूवर खर्च करणार नाहीत. ही खूप वाईट गोष्ट आहे, परंतु हे सत्य आहे.

झी 5 चे किती नवीन सब्सक्राइबर झाले?
झी 5 ला राधे सारखा मोठा चित्रपट त्यांच्या प्लॅटफॉर्मवर रिलीज करुन नवीन सब्सक्राइबर जोडण्याची अपेक्षा होता. झी ग्रुप स्वतः राधेला 42 लाख व्यूज मिळाल्याचे सांगत आहे. समजा एका घरात टीव्ही सेटवर चार जणांनी हा चित्रपट पाहिला तर, राधेच्या सब्सक्राइबरची संख्या दहा लाखांच्या घरात होईल. यामध्ये 30 टक्के नवीन सदस्य असू शकतात. हे तीन लाख नवीन ग्राहकच झी 5 चा फायदा मानला जाईल.

बातम्या आणखी आहेत...