आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

64 वर्षांचा झाला सनी देओल:विवाहित असूनही अमृता सिंगच्या प्रेमात पडला होता सनी देओल, सत्य समोर आल्यानंतर अमृताने आयुष्यातून घेतला होता काढता पाय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सनी आणि डिंपलचे नाते तब्बल 11 वर्षे टिकले.

बॉलिवूडचा मॅचोमॅन सनी देओलचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 64 वर्षे पूर्ण केली आहेत. 19 ऑक्टोबर 1956 रोजी साहनेवाल, लुधियाना (पंजाब) येथे त्याचा जन्म झाला. सनीने 1983 मध्ये 'बेताब' या चित्रपटाद्वारे आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. त्याने आपल्या कारकीर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत, ज्यात कर्ज, बॉर्डर, गदर, अर्जुन, क्रोध, घायल, योद्धा, त्रिदेव, चालबाज अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. यासह त्याच्या 'गदर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक विक्रम मोडले होते.

तसे पाहता, सनी चित्रपटांबरोबरच आपल्या लव्ह अफेअरसाठीही ओळखला जातो. 'बेताब'च्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री अमृता सिंगसोबत सनीचे सुत जुळले होते. विशेष म्हणजे त्यावेळी सनीचे पूजासोबत लग्न झाले होते. परंतु त्याने हे अमृतापासून लपून ठेवलेले होते.

  • कुटुंबाच्या दबावामुळे सनीने केले होते लग्न

चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच सनीचे लग्न पूजासोबत झाले होते. बिझनेस अॅग्रीमेंट अंतर्गत त्याचे हे लग्न झाले होते. 'बेताब' रिलीज होण्यापूर्वी सनीच्या लग्नाची बातमी उघड होऊ नये, असे धर्मेंद्र यांचे म्हणणे होते. कारण त्यामुळे सनीच्या रोमँटिक इमेजवर निगेटिव्ह परिणाम पडला असता.

चित्रपट रिलीज होईपर्यंत पूजा लंडनमध्ये होती. त्यावेळी सनी पूजाला भेटण्यासाठी गुपचुप लंडनला जात असे. त्यानंतर जेव्हा वर्तमानपत्रांमध्ये सनीच्या लग्नाच्या बातम्या प्रकाशित झाल्या, त्यावेळीसुध्दा सनीने बातम्यांचे खंडन केले होते.

  • अमृताच्या आईला मान्य नव्हते नाते

अमृताची आई रुखसाना सुल्ताना आधीपासूनच या नात्याच्या विरोधात होते. सनीची आई प्रकाश कौर यांनासुध्दा हे नाते खटकत होते. कारण त्यांना सनीच्या लग्नाची माहिती होती. सनीचे सत्य समोर आल्यानंतर अमृताने त्याच्यासोबतचे नाते तोडले आणि आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिचे नाव रवी शास्त्रीसोबत जुळले. परंतु हे नाते दिर्घकाळ टिकू शकले नाही. या नात्यानंतर अमृताच्या आयुष्यात सैफ अली खान आला. सैफ आणि अमृताचे 1991मध्ये लग्न झाले होते.

  • सनीच्या आयुष्यात डिंपलची एन्ट्री

अमृतापासून विभक्त झाल्यानंतर डिंपल कपाडियाचा सनीच्या आयुष्यात प्रवेश झाला. 1982 मध्ये राजेश खन्नाशी घटस्फोट घेतल्यानंतर डिंपल सनी देओलच्या जवळ आली होती. पिंकविलाच्या 'फ्रायडे फ्लॅशबॅक' या लेखानुसार, ''जेव्हा सनी आणि डिंपल एकमेकांना डेट करत होते, तेव्हा डिंपलच्या मुली ट्विंकल आणि रिंकी खन्ना सनीला 'छोटे पापा' म्हणून हाक मारत होत्या.

सनी आणि डिंपल एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत असत. 1984 मध्ये आलेल्या 'मंजिल-मंजिल' या चित्रपटात दोघांनी प्रथमच एकत्र काम केले होते. दोघेही लिव्ह-इनमध्ये राहत होते. सनीची पत्नी पूजा मुंबईतच होती पण तो पत्नीसोबत नव्हे तर डिंपलबरोबर राहात होता. दोघांनीही (सनी आणि डिंपल) आपली लव्ह लाईफ बराच काळ कॅमेर्‍याच्या नजरेपासून लपवून ठेवली होती.''

सनी आणि डिंपलचे नाते तब्बल 11 वर्षे टिकले. दोघांच्या अफेअरची बातमी जेव्हा सनीची पत्नी पूजा कानावर गेली तेव्हा तिने सनीला डिंपलपासून वेगळे होण्यास सांगितले. डिंपलपासून विभक्त न झाल्यास घर सोडून जाण्याची धमकी पूजाने सनीला दिली होती. अखेर सनी आणि डिंपल वेगळे झाले.

प्रेम कमी झाले नाही?

2017 मध्ये, सनी आणि डिंपल हे युरोपच्या मोनाको येथे एकत्र दिसले होते. दोघांचा एक फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोत दोघेही बस स्टॉपवर एकमेकांचा हात हातात पकडून एकत्र बसले होते.

बातम्या आणखी आहेत...