आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Love Story Of Amitabh And Jaya: Jaya's Friends Used To Tease Amitabh Bachchan As Lambu, Married Becasue Of Harivansh Rai Bachchan's One Condition

लग्नाला 48 वर्षे पूर्ण:अमिताभ बच्चन यांना लंबू म्हणून चिडवायच्या जया यांच्या मैत्रिणी, हरिवंश राय यांच्या एका अटीमुळे करावे लागले होते दोघांना लग्न

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रंजक आहे जया-अमिताभ यांची लव्ह स्टोरी..

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि जया यांच्या लग्नाला आज 48 वर्षे पूर्ण झाली आहेत. 3 दून 1973 रोजी दोघांचे लग्न झाले होते. दोघांनी शोले, सिलसिला, जंजीर, कभी खुशी कभी गम सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत एकत्र काम केले. आज दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया बिग बी आणि जया यांच्या लव्ह स्टोरीविषयी...

अशी होती बिग बी-जया यांची पहिली भेट
जया बच्चन पुण्यात शिकत होत्या त्यावेळी अमिताभ त्यांचा पहिला चित्रपट 'सात हिंदुस्तानी' (1969) च्या शुटिंगसाठी पुण्यात आले होते. त्यामुळे जया बच्‍चन त्यांना ओळखत होत्या. जया यांच्या मैत्रिणी अमिताभ यांनी लंबू-लंबू म्हणून चिढवायच्या. पण जया यांच्या मनात त्यांची प्रतिमा हरिवंशराय यांचा संस्कारी आणि साधा मुलगा अशी होती.

अशी सुरु झाली लव्ह स्टोरी
हृषिकेश मुखर्जींनी त्यांच्या 'गुड्डी' चित्रपटासाठी जया भादुरी यांच्यासह अमिताभ बच्चन यांना कास्ट केले होते. पण नंतर अमिताभ बच्चन यांना चित्रपटातून बाजुला करण्यात आले. फिल्म इंडस्ट्रीचे जानकार सांगतात की, याच प्रकरणानंतर जया यांच्या मनात अमिताभ यांच्याबद्दल प्रेम आणि सहानुभुती निर्माण झाली होती.

बिग बी-जया यांना 'जंजीर'च्या रिलीजनंतर एकत्र फिरायला जायचे होते
स्वतः बिग बींनी आपल्या लग्नासंबंधित एक किस्सा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता.वडिलांच्या आज्ञेचं पालन करुन लग्न केल्याचे त्यांनी सांगितले होते. सोबतच अमिताभ यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते, 'जर 'जंजीर' हिट झाला तर आम्ही काही मित्र पहिल्यांदा लंडनला जाऊ असे आम्ही ठरवले होते. मग माझ्या वडिलांनी विचारले की, तू कोणाबरोबर जात आहेस? मी कोणाबरोबर जात आहे हे जेव्हा मी त्यांना सांगितले, तेव्हा ते म्हणाले - तुला जायचे असेल तर तुला हिच्याबरोबर आधी लग्न करावे लागेल, नाहीतर तू जाऊ नकोस... म्हणून... मी त्या आज्ञेचे पालन केले,' असे बिग बींनी सांगितले होते.

'जंजीर' अमिताभ यांचा पहिला सोलो हिट
11 मे 1973 रोजी रिलीज झालेला 'जंजीर' हा अमिताभ बच्चन यांचा पहिला सोलो हिट चित्रपट होता. सिनेसृष्टीतील चार वर्षांच्या संघर्षानंतर बिग बींना या चित्रपटामुळे यशाची चव चाखता आली होती. या चित्रपटापूर्वी त्यांनी 12 चित्रपटांमध्ये काम केले होतो. पण त्यापैकी फक्त दोन चित्रपट (लीड अभिनेता म्हणून बॉम्बे टू गोवा आणि सहायक अभिनेता म्हणून आनंद) हिट झाले होते. पण जंजीरसुद्धा त्यांना अनेक संघर्षानंतर मिळाला होता.

नशिबाने मिळाला होता अमिताभ यांना 'जंजीर'
अमिताभ बच्चन यांच्या आधी 'जंजीर' या चित्रपटासाठी धर्मेंद्र, देव आनंद आणि राजकुमार यांना विचारणा झाली होती. पण हे कदाचित अमिताभ यांचे नशीब असेल की, या तिघांपैकी कुणासोबतही चित्रपट फ्लोअरवर येऊ शकला नाही. प्रकाश मेहरा यांनी एका मुलाखतीत या मागची कहाणी सांगितली होती. हा चित्रपट मुळात त्यांचा चित्रपट नव्हता. धर्मेंद्र यांनी सलीम-जावेद यांच्याकडून कहाणीचे हक्क खरेदी केले होते. त्यावेळी मेहरा 'समाधी' या नावाने एक चित्रपट बनवण्याचा विचार करत होते. धर्मेंद्र यांना जेव्हा समाधी या चित्रपटाविषयी कळले तेव्हा त्यांना तो चित्रपट इतका भावला की, त्यांनी 'समाधी'च्या मोबदल्यात मेहरा यांना 'जंजीर' दिला.

बातम्या आणखी आहेत...