आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायद्याच्या कचाट्यात सापडली 'हरयाणवी क्वीन':सपना चौधरीविरोधात लखनऊ न्यायालयाने जारी केला अटक वॉरंट, जाणून घ्या नेमके प्रकरण काय आहे?

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे प्रकरण तीन वर्षे जुने आहे.

‘हरयाणवी क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी अडचणीत सापडली आहे. लखनऊ न्यायालयाने सपनाविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. एक कार्यक्रम रद्द करून तिकीट खरेदी करणाऱ्यांचे पैसे लुबाडल्याबद्दल सपनावर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी 22 नोव्हेंबरला होणार आहे.

तीन वर्षे जुने आहे प्रकरण
वृत्तानुसार, हे प्रकरण 3 वर्षांपूर्वीचे आहे. 13 ऑक्टोबर 2018 रोजी सपनाचा एक परफॉर्मन्स होणार होता, ज्यासाठी 300 रुपये तिकिट शुल्क आकारण्यात आले होते. ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने तिकिटांची विक्री करण्यात आली होती. हजारोच्या संख्येनी लोक या कार्यक्रमाला पोहोचले होते. मात्र, सपना तिथे पोहोचली नाही, त्यानंतर बराच गदारोळ झाला. त्यानंतर लोकांनी तिकिटाचे पैसे परत मागितले असता त्यांना तेही मिळाले नाहीत.

याप्रकरणी 14 ऑक्टोबर 2018 रोजी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. यामध्ये सपना चौधरीसोबत या कार्यक्रमाचे आयोजक जुनैद अहमद, नवीन शर्मा, किवद अली, अमित पांडे, रत्नाकर उपाध्याय यांचाही उल्लेख होता. आता याप्रकरणी लखनऊ न्यायालयाने सपना चौधरीविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...