आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माफीनामा:'ब्राह्मण हे इब्राहिमचे वंशज आहेत' म्हणत लकी अलींनी आधी फोडले वादाला तोंड, आता मागितली माफी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध गायक लकी अली यांनी 'ब्राह्मण' हा शब्द 'अब्राहम' किंवा 'इब्राहिम' वरून आला आहे अशी पोस्ट सोशल मीडियावर लिहिली होती. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरुन चांगलेच वादंग उठले. त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. वाढता वाद बघता गायकाने लगेच माफीही मागितली आहे.

लकी अली यांनी सोशल मीडियावर माफी मागणारी पोस्ट शेअर केली आहे. जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो, असे लकी अलींनी म्हटले आहे.

कोणाविरुद्ध द्वेष निर्माण करण्याचा माझा हेतू नव्हता
लकी अली यांनी माफी मागत लिहिले, 'मी याआधी लिहिलेल्या पोस्टवरून निर्माण झालेला विवाद जाणवला. कोणातही वाद किंवा कोणाविरुद्ध द्वेष निर्माण करण्याचा माझा हेतू नव्हता. याबद्दल मला खेद वाटते. मी सगळ्यांना एकत्र आणण्याच्या विचारानेच पोस्ट लिहिली होती. मात्र यापुढे मी जे काही पोस्ट करेन त्यामागील माझ्या शब्दांबद्दल मी अधिक जागरूक राहीन. माझ्या पोस्टमुळे अनेक हिंदू बंधू- भगिनींच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी त्यांची मनापासून माफी मागतो. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो.'

ब्राह्मण इब्राहिमचे वंशच - लकी अली
रविवारी लकी अली यांनी लिहिले की, 'ब्राह्मण' हा शब्द 'ब्रह्मा' वरून आला आहे जो 'अबराम' वरून आला आहे आणि जो 'अब्राहम' किंवा 'इब्राहिम'वरून आला, ज्यांना सर्व राष्ट्रांचे पिता मानले जाते. ब्राह्मण हे इब्राहिमचे वंशज असल्याचेही त्यांनी सांगितले. अलैहिस्सलाम... सर्व राष्ट्रांचे पिता... मग प्रत्येकजण विनाकारण एकमेकांशी भांडण का करतो? असेही त्यांनी म्हटले.

नेटकऱ्यांनी साधला निशाणा

​​​​​​​सोशल मीडियावर लकी अली यांची पोस्ट समोर येताच सोशल मीडिया यूजर्सनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली. एका नेटकऱ्याने लिहिले, 'लकी अलीने तालिबान कॉलेज ऑफ आर्ट्स अँड हिस्ट्री येथून डिग्री घेतली आहे.' एक एकाने लिहिले, 'ओसामा बिन लादेनचा इतिहासाच्या वर्गाला हजेरी लावल्यानंतर लकी अली.'