आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हलाखीच्या परिस्थितीत गीतकाराचा मृत्यू:'इतनी शक्ती हमें देना दाता' या गाण्याचे गीतकार अभिलाष यांचे लिव्हर कॅन्सरने निधन, 10 महिन्यांपासून होते अंथरुणावर, कुटुंबाकडे नव्हते ट्रान्सप्लांटसाठी पैसे

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिलाष यांच्या पत्नी नीरा यांनी इंडियन परफॉर्मिंग राइट्स सोसायटी (IPRS) कडे तातडीने आर्थिक मदत मागितली होती. - Divya Marathi
अभिलाष यांच्या पत्नी नीरा यांनी इंडियन परफॉर्मिंग राइट्स सोसायटी (IPRS) कडे तातडीने आर्थिक मदत मागितली होती.
  • ​​​​​​अभिलाष यांनी 'सावन को आने दो' (1979), 'लाल चूडा' (1974), 'अंकुश' (1986) सारख्या चित्रपटांसाठी गाणी लिहिली.
  • दोन दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती समोर आली होती. त्यांच्या पत्नीने आर्थिक मदतीची विनंती केली होती.

'अंकुश' या चित्रपटातील 'इतनी शक्ती हमें देना दाता' या गाण्याचे गीतकार अभिलाष यांचे मुंबईत निधन झाले आहे. वृत्तानुसार सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिलाष गेल्या काही महिन्यांपासून लिव्हर कॅन्सरशी झुंज देत होते. ते मागील 10 महिन्यांपासून अंथरुणाला खिळून होते. त्यांचे यकृत प्रत्यारोपण करायचे होते. परंतु आर्थिक अडचणींमुळे हे होऊ शकले नाही.

  • पत्नीने IPRS कडे आर्थिक मदत मागितली होती

अभिलाष यांच्या प्रकृतीची माहिती दोन दिवसांपूर्वी माध्यमांतून समोर आली होती. त्यांच्या पत्नी नीरा अभिलाष यांनी इंडियन परफॉर्मिंग राइट्स सोसायटी (आयपीआरएस) कडे तातडीने आर्थिक मदत मागितली होती.

  • उपचारांवर जमापुंजी खर्च झाली

अभिलाष यांच्या वैद्यकीय उपचारावर त्यांच्या कुटुंबाने सर्व जमापुंजी खर्च केल्याचे कौटुंबिक सूत्रांनी सांगितले आहे. सुरुवातीला त्यांच्या हितचिंतकांकडून त्यांना मदतीचा हात मिळाला होता. मात्र जास्त दिवस ते खर्च उचलू शकले नाहीत. कारण लिव्हर कॅन्सरच्या उपचारांचा खर्च खूप महाग असतो.

  • या चित्रपटांसाठी गाणी लिहिली होती

IMDB च्या यादीनुसार अभिलाष यांनी 'रफ्तार' (1975), 'जहरिली' (1977), 'सावन को आने दो' (1979), 'लाल चूडा' (1974), 'अंकुश' (1986), 'हलचल' (1995) आणि 'मोक्ष' (2013) सारख्या चित्रपटांसाठी गाणी लिहिली होती. याशिवाय त्यांनी 'जय जगन्नाथ' (2007) या चित्रपटासाठी संवादलेखन केले होते. तर 'जीते है शान से' (1988) या चित्रपटासाठी त्यांना अॅडिशनल स्टोरीसाठी श्रेय देखील देण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...