आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दुःखद:'वादा रहा सनम'सारखी गाजलेली गाणी लिहिणारे गीतकार अनवर सागर यांचे निधन, वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हृदयविकाराच्या झटक्याने झाले निधन
Advertisement
Advertisement

अक्षय कुमारच्या गाजलेल्या 'खिलाडी' या चित्रपटातील 'वादा रहा सनम'सारखी गाणी लिहिणारे ज्येष्ठ गीतकार अनवर सागर यांचे बुधवारी निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन रूग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना रुग्णालयात आणले जाईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे वय 70 च्या आसपास होते.

अनवर सागर यांचा मुलगा सुलतान सागर यांनी सांगितले की, सकाळी त्यांची तब्येत खराब झाल्यानंतर आम्ही त्यांना सुजॉय, मॉर्डन आणि क्रिटी केअर अशा अनेक रुग्णालयात नेले. पण या सर्व ठिकाणी जागा नसल्याचे कारण सांगून त्यांना उपचार नाकारले. त्यानंतर त्यांना तातडीने अंधेरीच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तेथे पोहोचताच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले पण त्यांना यश मिळू शकले नाही. दुपारी 12 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

हृदयविकाराच्या झटक्याने झाले निधन 

गायक आणि इंडियन परफॉर्मिंग राइट्स सोसायटीचे बोर्ड सदस्य अहमद यांनी सांगितल्यानुसार, अनवर सागर हे दीर्घ काळापासून हृदयविकाराच्या आजाराशी झगडतहोते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. अनवर यांच्याशी माझी मैत्री असल्याचे त्याने सांगितले. म्युझिक इंडस्ट्रीत सुरू असलेल्या समस्यांवर आम्ही चर्चा करायचो. अनवर यांचा मृत्यू फिल्म इंडस्ट्रीसाठी भरुन न निघणारी पोकळी असल्याचे त्यांनी म्हटले.  

80 आणि 90 च्या दशकात लिहिली गाणी 

अनवर यांनी 80 आणि 90 च्या दशकात डेव्हिड धवन यांच्या 'याराना', जॅकी श्रॉफच्या 'सपने साजन के', अक्षय कुमारच्या 'खिलाडी', 'मैं खिलाडी तू अनाडी' आणि अजय देवगनच्या 'विजयपथ' या चित्रपटांसाठी गाणी लिहिली. 'खिलाडी' चित्रपटातील 'वादा रहा सनम' या गाण्यामुळे त्यांना इंडस्ट्रीत वेगळी ओळख मिळाली. हे गाणे अक्षय आणि आयशा जुल्कावर चित्रित करण्यात आले होते.

Advertisement
0