आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावेद अख्तरांनी सुनावले:कंगनाच्या 'भीक' या वक्तव्यावर जावेद अख्तर म्हणाले - ज्यांचा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीशी काहीच संबंध नव्हता...

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनावर अनेक एफआयआर दाखल, पद्मश्री परत घेण्याची मागणी

अभिनेत्री कंगना रनोट हिने अलीकडेच एका मुलाखतीत भारताचे स्वातंत्र्य म्हणजे 'भीक' आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर सर्वच स्तरातून तिच्यावर टीका होऊ लागली. आता जावेद अख्तर यांनीही कंगनाच्या या विधानावर आपली प्रतिक्रिया मांडली आहे. जावेद अख्तर यांनी ट्विटरवर लिहिले, 'ज्यांचा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीशी काहीच संबंध नव्हता, असे लोक आपल्या स्वातंत्र्याला भीक म्हणत असतील तर का वाईट वाटेल, म्हणून हे मी पूर्णपणे समजू शकतो.'

कंगनावर अनेक एफआयआर दाखल, पद्मश्री परत घेण्याची मागणी
कंगनाच्या विरोधात देशभरात तक्रारी दाखल झाल्या आहेत. कंगनाच्या या वादग्रस्त विधानावर या तक्रारी आल्या आहेत. कंगना एका मुलाखतीत म्हणाली होती, "...रक्त वाहतयं. पण ते नक्कीच हिंदुस्थानी रक्त नसावे. त्यांना ते माहिती आहे आणि त्यांनी त्याची किंमत देखील मोजली. अर्थात ते स्वातंत्र्य नव्हते तर भीक होती, आणि खरे स्वातंत्र्य तर आम्हाला 2014 मध्ये मिळाले आहे.' यानंतर तिचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची मागणी होऊ लागली आहे.

जावेद आणि कंगना यांच्यात सुरु आहे वाद
जावेद अख्तर यांनी गेल्या वर्षी 2 नोव्हेंबर 2020 रोजी मुंबईच्या अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात कंगना विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. कंगनाने एका मुलाखतीत म्हटले होते की, जावेद अख्तर बॉलिवूडमध्ये गटबाजी करत आहेत. आणि त्यांनी हृतिक रोशन प्रकरणात तिला धमकी दिली होती. यानंतर जावेद अख्तर यांनी त्यांचे वकील निरंजन मुंदरगी यांच्यामार्फत कंगनाच्या विरोधात आयपीसी कलम 499 आणि 500 अंतर्गत मानहानीचा खटला दाखल केला होता.

बातम्या आणखी आहेत...