आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रोलिंग:4 वर्षांच्या लेकीला लिपस्टिक-लायनर लावल्यामुळे ट्रोल झाली माही विज, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही अभिनेत्री माही विज नुकतीच कोविडमधून बरी झाली आहे. कोरोनातून सावरल्यानंतर तिने नुकतीच कॉमेडियन भारती सिंगच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीत माहीसोबत तिची मुलगी ताराही दिसली. मात्र हा व्हिडिओ समोर येताच नेटकऱ्यांनी माहीला चांगलेच सुनावले आहे.

नेमके काय घडले?
बर्थडे पार्टीतून बाहेर पडल्यानंतर माहीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिच्या कडेवर तिची चार वर्षांची लेक तारादेखील होती. व्हिडिओमध्ये माहीने तिच्या 4 वर्षांच्या मुलीला लाल लिपस्टिक आणि आय लाइनर लावल्याचे दिसत आहे. एवढेच नाही तर माही या व्हिडिओमध्ये लोकांना मास्क घालण्याचे आवाहन करत आहे. पण तिने स्वतः मात्र मास्क घातलेला नाही आणि मुलीलाही मास्क घातलेला नाही. यावरुन नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरले आहे.

माही विज झाली ट्रोल
व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'एवढ्या लहान मुलीला इतका मेकअप करू नका, तिला त्याची गरज नाही.’ आणखी एका युजरने म्हटले, ‘लहान मुलीला इतका मेकअप. तू वेडी आहेस का?’ तर आणखी एकाने लिहिले, ‘आधी स्वतः मास्क घाला, मग हा सल्ला इतरांना दे’.

अलीकडेच माहीला झाली होती कोरोनाची लागण
माहीला काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. तिने स्वतः ही बातमी शेअर केली होती. आपल्या मुलांनाही भेटता येत नसल्याचे दुःख तिने बोलून दाखवले होते.

माही म्हणाली होती, "चार दिवसांपूर्वीच करोनाची लागण झाली असल्याचं मला कळालं. ताप आणि इतर लक्षणं मला जाणवू लागल्यानंतर मी टेस्ट केली. कोरोना चाचणी करू नको असे मला सगळ्यांनी सांगितले. पण घरात लहान मुले आहेत तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मी ही चाचणी करुन घेतली. काही दिवस मला श्वास घेण्यासही त्रास होत होता. याआधीही मला कोरोनाची लागण झाली होती. पण तेव्हा इतका त्रास झाला नाही. मी माझ्या मुलांपासून लांब आहे. जेव्हा ताराला मी व्हिडिओ कॉलवर पाहते तेव्हा ती, 'आई आम्हाला तू आमच्या जवळ हवी आहेस' असे सातत्याने म्हणते," असे माहिने सांगितले होते. 2021 मध्ये माहीने कोरोनामुळे तिच्या धाकट्या भावाला गमावले होते.