आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आहेत 'शोले'च्या 'सांभा'च्या लेकी:मॅक मोहनच्या मुलींनी बनवला चित्रपट, स्केट बोर्डिंगवर आधारित पहिला हिंदी चित्रपट येणार

उमेश कुमार उपाध्याय17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या या सिनेमाविषयी...

जुन्या काळातील प्रसिद्ध अभिनेते मॅक मोहन यांच्या दोन मुली मंजरी आणि विनती माकजानी चित्रपट दिग्दर्शन आणि निर्मितीत उतरल्या आहेत. त्या दोघी स्केट बोर्डिंगवर आधारित बॉलिवूडचा पहिला सिनेमा घेऊन येत आहेत. चित्रपटाचे शीर्षक 'स्केटर गर्ल’ आहे. तो 11 जून रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. जाणून घ्या या सिनेमाविषयी...

याविषयी निर्माती विनतीने सांगिते, चित्रपटाची दिग्दर्शक आणि माझी बहीण मंजरी एका कथेच्या शोधात होती. आम्ही 2016 मध्ये एक व्हिडिओ पाहिला. त्यावेळी भारतात स्केटिंगची सुरुवात झाली होती. खूपच संशोधन केल्यानंतर मध्यप्रदेशच्या जनवार गावात एक स्केट बोर्डिंग आणि कोबलममध्ये एक स्केट पार्क असल्याचे कळाले. तेथे काही मासेमारी करणाऱ्यांची मुले शिकतात. त्याच काळात आम्ही राजस्थानला गेलो. तेथील मुलींसोबत चर्चा करुन त्यांच्याविषयी जाणून घेतले. तेव्हा कळाले ही एक चांगली सकंल्पना ठरू शकते. त्यानंतर आम्ही स्केट्स आणि त्या मुलीवर चित्रपटाची कथा लिहिली.

  • 5 हजार मुलांमधून निवडले 3 मुख्य पात्र

या चित्रपटासाठी मुलांची निवड करणे निर्मांत्यापुढे मोठे आव्हान हाेते. यातील काही मुलांना स्केट बोर्डिंग शिकवले आहे. त्यासाठी अनेक शाळेत जाऊन सुमारे 5 हजार मुलांचे ऑडिशन घेतले, त्यापैकी 3 फायनल मेन पात्र निवडले गेले. याशिवाय सह कलाकार म्हणून शूटिंगच्या जवळपास गावातील 30 ते 35 मुले निवडण्यात आली. येथे स्केट पार्क बनवल्यानंतर ते लोकल मुलांसाठी उघडे करण्यात आले. जे मुले पाच ते सहा महिने स्केट बोर्डिंग शिकले, तेदेखील सिनेमात सहभागी झाले.

  • वहिदा रेहमान दहा मिनिटांत तयार झाल्या

विनती आणि मंजरी सांगतात, चित्रपटाची कथाा लिहिताना महाराणीच्या भूूमिकेसाठी आमच्या डाेक्यात फक्त वहीदा रेहमान होत्या, कारण ही फारचं दमदार भूमिका आहे. या पात्राशिवाय चित्रपटाची कथा पुढे सरकत नाही. वहीदाजी सोबत आम्ही बऱ्याच महिन्यापासून बोलण्याचा प्रयत्न करत हाेतो. एक दिवशी त्यांच्याशी बोलणे झाले. आणि त्या लगेच चित्रपटात काम करण्यासाठी तयार झाल्या.
निर्मितीच्या वेळी काय होते आव्हान

  • या चित्रपटावर संशोधन करण्यात पाच वर्षे लागली.
  • स्केट बोर्डिंगवर अजून एकही सिनेमा आला नाही. त्यामुळे याचे नियोजन कसे करावे यात वेळ लागला.
  • राजस्थानमध्ये उन्हाळ्यात 15 हजार स्क्वेअर फुटाच्या स्केट पार्कमध्ये शूट करणे खूपच अवघड गेले. यासाठी प्रशिक्षक शाेधणे, मुलांना शिकवणे अवघड काम होते.
बातम्या आणखी आहेत...