आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Madhu Mantena Was To Make Ramayan In 500 Crores And Draupadi In 200 Crores After 5 Flops, Since Then He Was On IT's Radar, Also Bought Half Of Phantom Films

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर एक्सक्लुझिव्ह:सेलेब्सवरील कारवाईमागची मोठी कारणे - 5 फ्लॉप चित्रपटांनंतरही मधु मंटेना 700 कोटींमध्ये बनवणार होते 2 चित्रपट, तेव्हापासून ते IT च्या रडारवर होते

अमित कर्णएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मधु मंटेना यांनी 500 कोटींत रामायण आणि 200 कोटींत द्रौपदी हे दोन चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती.

आयकर विभागाने बुधवारी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू आणि चित्रपट निर्माता विकास बहल, मधु मंटेना यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले. अनुराग आणि तापसी वेळोवेळी सरकारविरोधात बोलत होते. त्यांनी नव्या कृषी कायद्यांविरुद्ध सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनालाही पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे ही कारवाई झाली असल्याची चर्चा रंगत आहे. मात्र चित्रपटसृष्टीतील सूत्रांनी भास्करला दिलेल्या माहितीनुसार, मधु मंटेना आधीपासूनच आयकर विभागाच्या रडारवर आहे.

एका महिन्यापूर्वी मंटेना यांनी फँटम फिल्म्समध्ये 50% भागीदारी विकत घेतली. त्यांनी या प्रॉडक्शन हाऊसमध्ये अनुराग कश्यप, विकास बहल आणि विक्रमादित्य मोटवानी यांचे एकूण 37.5% शेअर्स खरेदी केले. आधीपासूनच त्यांचा या प्रॉडक्शन हाऊसमध्ये 12.5% वाटा ​​होता. अशाप्रकारे मंटेना आता 50% चे भागीदार झाले आहे. या प्रॉडक्शन हाऊसमधील उर्वरित 50% वाटा अनिल अंबानी ग्रुपच्या रिलायन्स एंटरटेनमेंटच्या मालकीचा आहे.

  • मधु मंटेना जवळ मोठे प्रोजेक्टस आणि टॅलेंट एजन्सी

मधु मंटेना पत्नी मसाबा गुप्तापासून विभक्त झाले आहे. दोघांचा घटस्फोट झाला आहे. मधु मंटेना हे अभिनेत्री नीना गुप्ता यांचे जावई होते. याशिवाय ते विविध कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याबरोबरच मोठ्या बजेटचे चित्रपट बनवत असल्याने चर्चेत आहेत. ट्रेड पंडितांच्या म्हणण्यानुसार, मधु मंटेना यांनी 500 कोटींच्या बजेटमध्ये रामायण आणि 200 कोटींच्या बजेटमध्ये द्रौपदी (महाभारत) बनवण्याची घोषणा केली होती. चित्रपट निर्मितीबरोबरच क्वान ही टॅलेंट एजन्सी सांभाळण्याचेही काम त्यांच्याकडे आहे. ही एजन्सी बर्‍याच मोठ्या कलाकारांचे काम बघते. हा त्यांच्या उत्पन्नाचा आणखी एक स्रोत आहे.

  • मंटेना यांचे मागील 5 चित्रपट ठरले होते फ्लॉप

मधू मंटेना यांच्या प्रॉडक्शन हाऊसच्या मागील पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी केली होती. उदाहरणार्थ, 'भावेश जोशी: सुपरहीरो' या चित्रपटाने केवळ 1.45 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर डिजास्टर ठरला होता. तर 'मुक्काबाज' हा चित्रपट केवळ 1.63 कोटींचा व्यवसाय करू शकला होता. 'ट्रॅप्ड'चा व्यवसाय फक्त 2.85 कोटी इतका होता.

या सर्वांखेरीज 'रण', 'झुठा ही सही', 'रक्तचरित्र' या चित्रपटांचे कलेक्शन 8 ते 9 कोटींच्या पुढे गेले नाही. त्यांच्या करिअरमधील एकमेव 'गजनी' हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये सामील झाला होता. अशा परिस्थीतीत त्यांनी केलेली मोठ्या चित्रपटांची घोषणा आणि कमाईवर आयकर अधिका-यांची नजर होती.

  • तापसीच्या वाट्यालाही मोठे हिट कमी

बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित घोषणांवर लक्ष ठेऊन असणारे तज्ज्ञ म्हणाले की, सध्या तापसी पन्नूकडे बरेच चित्रपट आहेत. एका चित्रपटासाठी ती 8 कोटी रुपये घेते. असे असूनही, आयकर विभाग तिच्या मालमत्तेचा तपशील ठेवत होता. 'थप्पड' या चित्रपटाची बरीच चर्चा होती, पण त्याचे कलेक्शन 29 कोटी होते. 'सांड की आँख'ची कमाई 23 कोटींच्या घरात होती.

'मिशन मंगल' हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये सामील झाला खरा, पण तिथे अक्षय कुमार आणि विद्या बालन यांनी क्रेडिट घेतले. अमिताभ-तापसी स्टारर 'बदला' हा चित्रपट हिट ठरला. त्याचे कलेक्शन 87.57 कोटी इतके राहिले. तापसी आणि ऋषी कपूर स्टारर 'मुल्क'ने 21.89 कोटींचा व्यवसाय केला होता. तर 'दिल जंगली' अवघ्या सवा कोटींपर्यंत पोहोचला होता. 'रनिंग शादी' आणि 'नाम शबाना' या फ्लॉप चित्रपटांदरम्यान 'पिंक'ने मात्र 65 कोटींचा व्यवसाय केला होता.

विकास बहल यांच्या नावी 'सुपर 30' हा मोठा हिट चित्रपट
विकास बहल यांनी मधु मंटेना यांच्यासह मिळून 'भावेश जोशी: सुपरहीरो', 'हाय जॅक', 'मुक्काबाज', 'ट्रप्ड' या चित्रपटांनी सह निर्मिती केली होती. हे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले होते. मात्र 'सुपर -30' हा त्यांचा निर्मिती आणि दिग्दर्शित केलेला चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटाने 147 कोटींहून अधिकचे कलेक्शन केले होते.

  • अनुराग कश्यपचे चित्रपट सातत्याने फ्लॉप झाले तरीही मालमत्ता अधिक

व्यापार विश्लेषकांच्या मते, अनुराग कश्यपचे चित्रपट सतत फ्लॉप ठरले, परंतु त्या प्रमाणात त्यांची मालमत्ता जास्त असल्याचा संशय आहे. त्यामुळे तेही आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. 'रमण राघव 2.0', 'अग्ली', 'लुटेरा', 'बॉम्बे वेलवेट', 'मनमर्जिया' हे चित्रपट फ्लॉप झाले. 'मनमर्जियां'चा 25 कोटी, 'मुक्काबाज'चा 10 कोटी, 'रमण राघव'चा 6.80 कोटींचा व्यवसाय होता. 'बॉम्बे वेलवेट' हा डिजास्टर ठरला होता. अनुराग दिग्दर्शनाशिवाय निर्माता, संवाद लेखक आणि अभिनेतेही आहेत. अशा परिस्थितीत, त्या कमाईचा देखील विचार केला जाईल.

सध्या अनुराग आणि तापसी ‘दोबारा’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करत आहेत. बुधवारी झालेल्या कारवाईदरम्यान त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग झाले की नाही, याची माहिती समोर आलेली नाही. गेल्याच आठवड्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती.

बातम्या आणखी आहेत...