आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार्सच्या शेवटच्या दिवसांची वेदनादायी कहाणी:कुणी भीक मागताना तर कुणी आढळलं वेड्यांच्या इस्पितळात, म्हातारपणात या बॉलिवूड स्टार्सनी हलाखीच्या परिस्थितीत काढले दिवस

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही सेलिब्रिटींवर एक नजर टाकूया...

दिवंगत अभिनेत्री मधुबालाची बहीण कनीज बलसारा यांना त्यांची सून समीनाने घरातून हाकलून दिले आहे. एवढेच नाही तर 96 वर्षीय कनीज यांना त्यांच्या सुनेने एकही पैसा न देता थायलंडहून मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बसवले. ही माहिती कनीज यांची मुलगी परवीजलाही देण्यात आली नव्हती. कनीज भारतात आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने परवीज यांना दिली होती.

कनीज यांच्या आधीही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी वृद्धापकाळात अडचणीच्या वेळी कुटुंबाने एकटे सोडल्याच्या बातम्या आल्या आहेत. अशाच काही सेलिब्रिटींवर एक नजर टाकूया...

गीता कपूर

'पाकीजा' (1972) सारख्या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री गीता कपूर यांचे 26 मे 2018 रोजी निधन झाले होते. गीता यांचे अखेरचे दिवस हलाखीच्या परिस्थितीत गेले होते आणि त्यांच्या स्वत:च्या मुलांनी त्यांची काळजी घेतली नाही. गीता यांचा नृत्य दिग्दर्शक मुलगा त्यांना रुग्णालयात सोडून पळून गेला होता. अशोक पंडित आणि इतर बॉलिवूड सेलेब्स गीता यांच्यावर उपचारांचा खर्च करत होते.

विमी
1967 मध्ये रिलीज झालेल्या सुनील दत्त स्टारर ‘हमराज’ या चित्रपटातून विमी यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती. 'हमराज' या चित्रपटातील गाणी प्रचंड गाजली होती. हा चित्रपट हिट ठरल्यानंतर विमी यांना एका पाठोपाठ 10 चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मात्र, दारूचे व्यसन, वाढते कर्ज आणि कौटुंबिक नैराश्यामुळे विमी यांची कारकीर्द खराब झाली. स्टार बनल्यानंतर 10 वर्षानंतर त्यांचे निधन झाले. असे म्हणतात की, त्यांचा मृतदेह हातगाडीतून स्मशानभूमीत नेण्यात आला होता.

भारत भूषण
1940 दशकातील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक भारत भूषण यांच्या आयुष्यातीलसुध्दा शेवटचे क्षण वाईट होते. त्यांना हिंदी सिनेमांच्या उत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये सामील केले जात होते. विशेषत: त्यांचे धार्मिक सिनेमे बॉक्स ऑफिसवर गोल्डन ज्युबली साजरे होते. 'आनंद मठ', 'मिर्जा गालिब', 'बरसात की रात' आणि 'जहा आरा'सारखे हिट सिनेमे देणारे भारत भूषण यांच्या आयुष्यात एक काळ असाही आला, की त्यांना कुणीच विचारत नव्हते. मीना कुमारीसोबतच्या अफेअरला त्यांच्या करिअरचा डाउन फॉल मानले जाते. त्यानंतर त्यांना आणखी धक्का बसला जेव्हा त्यांना सिनेमांच्या ऑफर्स मिळणे बंद झाले. भारत भूषण यांच्याकडे उदरनिर्वाहासाठीसुध्दा पैसे नव्हते. त्यांनी एका फिल्म स्टूडिओमध्ये वॉचमनची नोकरी केली. 1992मध्ये एका भाड्याच्या घरात त्यांचे निधन झाले.

अचला सचदेव
'ऐ मेरी जोहरा जबी तुझे मालूम नही तू अभी तक है हसी...' हे गाणे 'वक्त' सिनेमातील मुख्य पात्र बीबी (अचला सचदेव) यांना पाहून बलराज साहनी यांनी गायले होते. अचला सचदेव यांचे निधन एप्रिल 2012 मध्ये झाले. अचला 2002मध्ये पतीच्या मृत्यूनंतर पुण्यात एकट्या राहिल्या. त्यांना बघणारे कुणीच नव्हते. एकेदिवशी पिण्याचे पाणी घेण्यासाठी गेलेल्या अचला घसरुन खाली पडल्या आणि त्यांच्या कमरेचे हाड मोडले. अचला यांचे कौटुंबिक मित्र राजीव नंदा यांच्या सांगण्यानुसार, त्यांनी बॉलिवूडमधील प्रसिध्द स्टार्सना फोनवर त्यांच्या आजाराविषयी सांगितले, मात्र त्यांची विचारपूस करायला कुणीच आले नाही. अचला यांचा मुलगा अमेरिकेमध्ये आणि मुलगी मुंबईमध्ये राहत होती. मात्र तेसुध्दा आईच्या संपर्कात नव्हते.

'जनसेवा फाउंडेशन' जिथे त्या दान द्यायच्या त्याच फाउंडेशनने शेवटच्या काळात त्यांना आधार दिला. पडल्यानंतर त्यांना पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले होते. तेव्हा त्यांच्या उपचाराचा खर्चसुध्दा जनसेवा फाउंडेशनने उचलला. अचला सचदेव यांनी या 'जनसेवा फाउंडेशन' आणि आणखी काही संस्थांना लाखोंचे डोनेशन दिले होते. त्यांनी स्वत:च्या पैशातून एक रुग्णालय उभे केले तिथे आता गरीबांवर उपचार केले जातात.

जगदीश माळी

अभिनेत्री अंतरा माळीचे वडील आणि प्रसिध्द फोटोग्राफर जगदीश माळी आपल्या शेवटच्या काळात मुंबईच्या रस्त्यावर भीक मागताना दिसले होते. त्यांना मिंक बरार नावाच्या मॉडेलने ओळखले आणि त्यांना जेवू घालून सलमान खानच्या कारने घरी पोहोचवले होते. जगदीश मानसिकरीत्या ठिक नव्हते. ते फाटलेले कपडे परिधान करुन होते. त्यावरुन ते किती वाईट परिस्थितीत आयुष्य जगत होते याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. 13 मे 2013 रोजी त्यांचा मृत्यू झाला होता.

राज किरण
'अर्थ' आणि 'कर्ज' सारख्या चित्रपटात झळकलेले अभिनेते राज किरण गेल्या अनेक वर्षांपासून बेपत्ता आहेत. कधी ते अमेरिकेत कॅब चालवत असल्याच्या बातम्या आल्या तर कधी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पण काही वर्षांपूर्वी ऋषी कपूर यांना राज किरण अमेरिकेत मानसिक रुग्णालयात असल्याची माहिती मिळाली होती. ऋषी कपूर 2011 मध्ये अमेरिकेला गेले होते. परत आल्यानंतर ऋषींनी सांगितले होते की, त्यांना राज किरण सापडले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर अटलांटा येथील मानसिक रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचाराचा खर्च राज स्वतः उचलतात. यासाठी ते रुग्णालयातच काम करतात. दरम्यान, मानसिक रुग्णालयात दाखल असलेल्या राज किरण यांना त्यांच्या कुटुंबीयांनी सोडून दिल्याचा दावाही एका अहवालात करण्यात आला आहे. राज किरण आता कुठे आहे, कोणालाच माहिती नाही.

बातम्या आणखी आहेत...