आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुबालाच्या बहिणीवर सूनेचा आत्याचार:96 वर्षीय कनीज बलसारा यांना घराबाहेर काढले, जवळ पैसे न देता विमानाने न्यूझीलंडहून मुंबईला पाठवले

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नातही आजीला वाईट वागणूक देत असे

दिवंगत अभिनेत्री मधुबालाची बहीण कनीज बलसारा यांना यांची सून समीनाने घरातून हाकलून दिले आहे. एवढेच नाही तर 96 वर्षीय कनीज यांना त्यांच्या सुनेने जवळ एकही रुपया न देत ऑकलंडहून मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बसवले. ही माहिती कनीज यांची मुलगी परवीजलाही देण्यात आली नव्हती. कनीज भारतात आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने परवीज यांना दिली होती.

समीनाला तिचे सासू-सासरे आवडत नाहीत
मीडियाशी बोलताना परवीज म्हणाल्या, 'आई 17-18 वर्षांपूर्वी न्यूझीलंडला गेली होती. तिचे माझा भाऊ म्हणजेच तिचा मुलगा फारुकवर खूप प्रेम होते आणि ती त्याच्याशिवाय राहू शकत नव्हती. भाऊसुद्धा आई बाबांवर प्रेम करत असे, म्हणूनच तो त्यांना सोबत घेऊन गेला. तो न्यूझीलंडच्या करेक्शन डिपार्टमेंटमध्ये काम करायचा. पण वहिनीला आमचे आई-वडील आवडत नाहीत. माझी आई मुंबईत आल्यानंतर मला समजले की माझा आता या जगात नाही. भाऊ गेल्यानंतर वहिनीची वागणूक अतिशय वाईट झाली.'

नातही आजीला वाईट वागणूक देत असे
परवीज पुढे म्हणाल्या, समीना कधीच आई आणि बाबांसाठी जेवण बनवत नसे. भाऊ रेस्तराँमधून त्यांच्यासाठी जेवण आणत असे. समीनाची मुलगी जिचे ऑस्ट्रेलियात लग्न झाले ती देखील तिच्या आजीसोबत गैरवर्तन करायची. समीनाने माझ्या आईला घराबाहेर काढले आणि जबरदस्तीने फ्लाइटमध्ये बसवले. तेव्हा समीनाची मुलगी देखील विमानतळावर उपस्थित होती.'

गेली 5 वर्षे आई भारतात आली नव्हती
परवीज यांनी सांगितले, 'मी अनेकदा न्यूझीलंडला जाते, कधी कधी वर्षातून दोनदा देखील तिथे जाणे होत असते. आईसुद्धा दोनदा भारतात आली होती. पण गेली पाच वर्षे ती आलीच नाही, कारण माझा भाऊ म्हणायचा की या वयात तिचं येणं सुरक्षित नाही. जास्त उंचीवर ऑक्सिजनच्या पातळीत चढ-उतार होतात, जे आईच्या आरोग्यासाठी चांगले नसते.'

आरटी-पीसीआरसाठीही पैसे नव्हते
परवीज यांनी रडत सांगितले, 'फ्लाइट लँड झाल्यानंतर मला विमानतळ प्राधिकरणाचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की तुमच्या आईकडे आरटी-पीसीआर चाचणीसाठी पैसे नाहीत. त्यानंतर मी त्यांना पैसे पाठवले, त्यानंतर तिचा आरटी-पीसीआर झाला.

मला भेटल्यानंतर ती सर्वप्रथम म्हणाली की, बेटा तुला माहित आहे का की फारुख आता नाही? मी त्याचे अंत्यसंस्कार करुन आले आहे आणि मला खूप भूक लागली आहे, मला काही खायला मिळेल का?' त्यानंतर मी माझ्या आईला घरी आणले, तिला खाऊ घातले. देवाचे आभार, निदान आई आता सुखरूप आहे.'

बातम्या आणखी आहेत...