आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करणविरोधात तक्रार:मधुर भांडारकरांनी करण जोहरवर लावला चित्रपटाचे शीर्षक चोरल्याचा आरोप, म्हणाले - माझा प्रोजेक्ट वाया घालवू नका

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • IMPPA मध्ये केली धर्मा प्रॉडक्शनची तक्रार

गेल्या आठवड्यात निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने आपल्या वेब रिएलिटी शो 'द फॅबुलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाईव्स' चा ट्रेलर रिलीज केला. हा शो ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. आता चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांनी करण आणि त्याची कंपनी धर्मा प्रॉडक्शन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्व मेहता यांच्यावर या वेब शोसाठी चित्रपटाचे शीर्षक चोरल्याचा आरोप केला आहे.

मधुर भांडारकर यांनी आपल्या नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, "प्रिय करण जोहर! तू आणि अपूर्व मेहता यांनी माझ्याकडे 'बॉलिवूड वाइव्स' या शीर्षकाची मागणी केली होती जी मी नाकारली. कारण माझे या प्रोजेक्टवर काम चालू आहे. तुम्ही 'द फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलीवूड वाइव्स' या शीर्षकाचा वापर केला, जो नैतिक आणि सैद्धांतिक रुपाने चुकीचे आहे. कृपया माझा प्रोजेक्ट खराब करु नका. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही तुमच्या शोचे शीर्षक बदलले पाहिजे."

IMPPA मध्ये केली धर्मा प्रॉडक्शनची तक्रार

सोशल मीडियावर आपली खंत व्यक्त करण्याबरोबरच मधुर भांडारकर यांनी इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर असोसिएशन (आयएमपीपीए) मध्ये धर्मा प्रॉडक्शनच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आयएमपीपीएचे म्हणण्यानुसार, त्यांनी करण जोहरच्या वेब शोसाठी हे टायटल जाहीर केले नाही. वृत्तानुसार असोसिएशनने धर्म प्रॉडक्शन आणि नेटफ्लिक्स यांना या संदर्भात पत्र लिहून शीर्षक बदलण्यास सांगितले आहे.

करण जोहर किंवा अपूर्व मेहता यांच्याकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. करणच्या या वेब शोमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांच्या पत्नी कसे आयुष्य जगतात हे दाखवले जाणार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser