आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंडिया लॉकडाऊन:मधूर खूपच विनोदी स्वभावाचा, सेटवर हसवत राहायचा; आहना कुमरासाेबत झालेली बातचीत...

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंडिया लॉकडाऊनमध्ये असेल चार कथा
या चित्रपटात सत्य घटनेवर आधारित मोठ्या चार कथा आहेत. या चारी कथा एका खास शैलीत पात्राच्या एकाकीपणावर आधारित आहेत. पहिली कथा एका उद्योजकाची आहे, तो एका जागी अडकतो, दुसरी एका मायग्रेंट वर्कर कपलची आहे. तिसरी दोन शेजाऱ्यांची कथा आहे, त्यात मी आहे. माझे पात्र एका पायलटचे आहे, तिची लॉकडाऊनच्या काळात शेजाऱ्यासोबत चांगली गट्टी जमते. चौथी कथा सेक्स वर्करची आहे, ज्याचे काम बंद झाले आणि कमाईचे कोणतेच साधन नसते. हे पात्र श्वेता बासु प्रसादने साकारले आहे.

पात्रासाठी केस कापले
चित्रपटासाठी निर्माते आणि माझे जुने मित्र संजय डावरा यांचा फोन आला होता. ते म्हणाले, मधुर भांडारकर भेटू इच्छित आहेत. मी पटकन त्यांना जाऊ भेटले. त्यांनी पाच मिनिट चर्चा करुन मला या भूमिकेसाठी फायनल केले. मधुर मला आहना कुमरा नव्हे तर माझ्या पात्राच्या रूपात पाहू इच्छित होता. नंतर आम्ही मेकअप आर्टिस्ट आणि हेअर स्टायलिश सोबत बसून खूप चर्चा केली. हेअर स्टायलिस्ट बऱ्याच प्रकारच्या विग घेऊन आल्या होत्या. विग लावूनही प्रयत्न केला मात्र ते चांगले दिसत नव्हते... त्यामुळे मी केस कापण्याचे ठरवले आणि लूकवर ध्यान दिले. अशा प्रकारे लूक फायनल करण्यासाठी पाच-सहा तास लागले.

मधुर तर गोविंदा सारखे हसवतात
मधुर भांडारकर यांचा स्वभाव खूप विनोदी आहे. त्यांच्याविषयी मला ही गोष्ट माहित नव्हती. मला वाटले गंभीर सिनेमा बनवतात, त्यामुळे खूपच गंभीर माणूस असेल. थोडे खडूस असल्याचे वाटले, मात्र मधुर त्याच्या अपोजिट निघाला. तो गोविंदा सारखा सर्वांना हसवतो. सेटवर मिमिक्री करतो, दोन-दोन मिनिटांमध्ये हसत असतो. मला बोलावून प्लेबॅक दाखवत होता, मी ते कधी पाहत नव्हते. त्यांच्या बोलण्याची पद्धत एकदम फनी आहे. सेटवर त्यांचा एक वेगळाच कोडर्वड असायचा. लाइट, कॅमेरा, अॅक्शन नंतर दृश्य चांगले झाले तर ‘जलवा’ म्हणायचे बिघडला तर ‘झंडू’ बोलत असत. सीनसाठी बोलवण्यासाठी म्हणत ये जरा मार्केटमध्ये ये... गरबा करतेस का ? कोणी दिसले नाही तर म्हणायचे मार्केटमधून कुठे गायब झालीस ? अशा प्रकारचे मजेदार बोलायचे.. त्यामुळे हसू यायचे.

बातम्या आणखी आहेत...