आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bollywood Breaking News Update | Today Latest Trending Entertainment Celebrity News, MADHUR BHANDARKAR And TAMANNAAH BHATIA 'BABLI BOUNCER' FIRST SCHEDULE ENDS

बॉलिवूड LIVE अपडेट्स:'ओम: द बॅटल विथ इन' 1 जुलै रोजी होणार रिलीज, आदित्य रॉय कपूरचा फर्स्ट लूक आला समोर

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

अभिनेता आदित्य रॉय कपूर स्टारर 'ओम: द बॅटल विथ इन' ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. स्वतः आदित्यने या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. पोस्टरच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, "ओम! 1 जुलै 2022 रोजी जगभरातील सिनेमांच्या पडद्यावर दाखल होणार आहे. 'ओम: द बॅटल विथ इन'." कपिल वर्मा दिग्दर्शित या चित्रपटात आदित्य व्यतिरिक्त संजना संघी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

  • तमन्ना भाटियाने 'बबली बाउंसर'च्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग केले पूर्ण,निर्मात्यांनी सेटवरील फोटो शेअर केला

अभिनेत्री तमन्ना भाटियाने आगामी 'बबली बाउंसर' या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले आहे. निर्मात्यांनी स्वतः चित्रपटाच्या सेटवरील तमन्नाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत तिच्यासोबत चित्रपटाचे दिग्दर्शक मधुर भांडारकरही दिसत आहेत. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...