आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शीर्षक चोरी प्रकरण:करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनवर संतापले मधुर भांडारकर, म्हणाले- पाच वेळा नोटिसा पाठवूनदेखील अद्याप कोणतेही अधिकृत उत्तर दिले नाही

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करण जोहरला 19 नोव्हेंबरपासून पाच वेळा नोटिसा पाठवण्यात आल्या.

शीर्षक चोरी प्रकरणी दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी पुन्हा एकदा चित्रपट निर्माता करण जोहरवर निशाणा साधला आहे. अलीकडेच आपल्या चित्रपटाचे शीर्षक कारण जोहरने चोरल्याचा आरोप त्यांनी केला होता. मधुर भांडारकर यांनी सांगितल्यानुसार, करण जोहरला 19 नोव्हेंबरपासून आतापर्यंत इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन (IMPPA) कडून दोनदा, इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन (IFTDA) कडून एकदा आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) कडून दोनदा नोटिसा पाठवण्यात आल्या. या सर्व नोटिसा ‘बॉलिवूड वाईफ्स’ या चित्रपटाचे शीर्षक हस्तगत केल्याबद्दल पाठवल्या गेल्या आहेत. परंतु यापैकी कोणत्याही नोटिसीवर धर्मा प्रोडक्शनने अद्याप कोणतेही अधिकृत उत्तर दिले नाही’, अशा आशयाचे ट्विट मधुर भांडरकर यांनी आज केले.

करणच्या शोचा ट्रेलर आल्यानंतर वाद वाढला
काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सने बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पत्नींवर आधारित वेब रिअॅलिटी शो ‘फॅब्युलस लाईव्ह्स ऑफ बॉलिवूड वाईफ्स’चा ट्रेलर प्रदर्शित केला होता. आता या कार्यक्रमामुळे चित्रपट निर्माते मधुर भांडारकर संतप्त झाले आहेत. ‘बॉलिवूड वाईफ्स’ हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव असून, त्यांनी ते करण जोहरला देण्यास नकार दिल्याचा दावा केला आहे. मधुर यांनी शोचे निर्माते करण जोहर आणि अपूर्व मेहता यांना त्यांच्या या कार्यक्रमाचे शीर्षक बदलण्याची विनंती केली आहे. या संदर्भात मधुर भांडारकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती.

मधुर भांडारकर यांनी याबद्दल ट्विट करत करण जोहरने हे शीर्षक बदलावे, अशी मागणी केली होती. ‘प्रिय करण जोहर, तू आणि अपूर्व मेहता यांनी मला वेब शोसाठी ‘बॉलिवूड वाईफ्स’ हे नाव मागितले होते. मी त्याला नकार दिला होता, कारण माझा त्याच नावाचा प्रोजेक्ट सुरू आहे. तरीही आपण आपण ‘फॅब्युलस लाईव्ह्स ऑफ बॉलिवूड वाईफ्स’ हे नाव वापरलेत, जे नैतिक आणि सैद्धांतिकदृष्ट्या चुकीचे आहे. कृपया, माझा प्रोजेक्ट खराब करू नका. या शोचे शीर्षक बदलण्यासाठी मी नम्रपणे विनंती करतोय’, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser