आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्हाला माहित आहे?:माधुरीला अभिनेत्री नव्हे व्हायचे होते सूक्ष्मजीवतज्ज्ञ, 9 फ्लॉप सिनेमांनंतर बनली सुपरस्टार, वाचा धकधक गर्लविषयीच्या या खास गोष्टी 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माधुरीच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्यातील काही फॅक्ट्स सांगत आहोत. ज्याविषयी तिच्या चाहत्यांना कदाचितच ठाऊक असावे.

बॉलिवूडमध्ये मिलियन डॉलर स्माईलची मालकीण माधुरी दीक्षित आज आपला 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. 15 मे 1967 रोजी मुंबईतील एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या माधुरीला बालपणापासूनच नृत्याची आवड आहे. ती एक तरबेज कथ्थक नृत्यांगना आहे. तिने सुमारे 8 वर्षे नृत्याचे शिक्षण घेतले होते. दोन दशकांहून अधिक काळ बॉलिवूडवर माधुरीने अधिराज्य गाजवले.

माधुरीला बॉलिवूडची डान्सिंग क्वीन म्हणून देखील संबोधले जाते. तिच्या प्रत्येक सिनेमात तिचा एक जबरदस्त डान्स परफॉर्मन्स हा ठरलेलाच असतो. 1984 मध्ये रिलाज झालेला माधुरी 'अबोध' हा पहिला सिनेमा फ्लॉप ठरला होता. काही फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर 'तेजाब' सिनेमाद्वारे माधुरीला पहिल्यांदा यशाची चव चाखायला मिळाली. या सिनेमातील 'एक दो तीन...' या गाण्याने माधुरीला एका रात्रीत स्टार बनवले. या सिनेमात वेस्टर्न डान्स करणे हे एक आव्हान असल्याचे माधुरीने म्हटले होते.

माधुरी दीक्षितचा जन्म 15 मे 1967 रोजी मुंबईमध्ये शंकर आणि स्नेहलता दीक्षित या मराठी मातापित्यांच्या घरी झाला. डिव्हाइन चाइल्ड हायस्कूलमध्ये तिने आपले प्राथमिक शिक्षण घेतले. नंतर मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर सूक्ष्मजीवतज्ज्ञ होण्याचा तिचा मानस होता. ती तरबेज कथक नृत्यांगना आहे. तिने सुमारे 8 वर्षे नृत्याचे शिक्षण घेतले होते.

बॉलिवूडची सुपरस्टार असलेल्या माधुरीने कधीच अभिनेत्री होण्याचा विचार केला नव्हता. मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर सूक्ष्मजीवतज्ज्ञ होण्याचा तिचा मानस होता.आपल्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार आपल्या नावी करणा-या माधुरीविषयी म्हटले जाते, की तिला जास्तीत जास्त सिनेमे हे तिच्या डान्सिंगमुळे मिळाले. तिच्या डान्समुळेच सिनेमे हिट होतात.

माधुरीला बॉलिवूडमध्ये 'डायरेक्टर्स अॅक्ट्रेस' म्हटले जाते. सूरज बडजात्या यांनी म्हटले होते, की यशस्वी दिग्दर्शक होण्यासाठी माधुरीसारख्या अभिनेत्रींसोबत काम करणे आवश्यक आहे.

'साजन' सिनेमाच्या शुटिंगदरम्यान माधुरी आणि संजय दत्त यांच्या अफेअरची भरपूर चर्चा झाली होती. त्यावेळी संजय दत्त विवाहित होता. त्यामुळे माधुरीच्या वडिलांनी त्यांच्या नात्याला परवानगी दिली नव्हती. काही दिवसांतच दोघांचे ब्रेकअप झाले होते. 

1984 साली 'अबोध' या सिनेमाद्वारे माधुरीने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मात्र या सिनेमाद्वारे ती प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यात अपयशी ठरली होती. त्यानंतर माधुरीने 'आवारा बाप', 'स्वाती' या फ्लॉप सिनेमांमध्येही काम केले होते. अखेर एक दिवस शोमॅन सुभाष घई यांची नजर माधुरीवर पडली. त्यांनी 'कर्मा' सिनेमातील एका डान्स सिक्वेन्ससाठी माधुरीची निवड केली. मात्र नंतर हा डान्स सिक्वेन्सच सिनेमातून काढून टाकण्यात आला होता. पण घई यांनी माधुरीला शब्द दिला, की ते आपल्या दुस-या सिनेमात तिला एक दमदार भूमिका देतील. यासोबतच त्यांनी माधुरीकडे एक अट ठेवली. सुभाष घई यांनी माधुरीला सांगितले की, छोट्या-मोठ्या भूमिका करणारी अभिनेत्री म्हणून स्वतःची इमेज तयार करु नकोस. माधुरीनेही त्यांचे म्हणणे ऐकले आणि सुभाष घईंनी त्यांच्या 'उत्तर-दक्षिण' या सिनेमात माधुरीला संधी दिली.खरं तर हा सिनेमासुद्धा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.

'दयावान' आणि 'वर्दी' यांसारख्या सिनेमांमध्ये दुय्यम भूमिका केल्यावर सुभाष घईंनी तिला मोठा ब्रेक दिला. 1988 साली माधुरी सुभाष घईंच्या 'तेजाब' सिनेमात झळकली. त्यात तिची प्रमुख भूमिका होती. या सिनेमाद्वारे तिला बरीच प्रसिद्धी मिळाली; तसेच तिला तिचे पहिले फिल्मफेअर पुरस्कारांचे नामांकनदेखील मिळाले. या सिनेमातील 'एक दो तीन...' या गाण्याने माधुरीने सगळ्यांचे होश उडवले आणि ती बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली.

'तेजाब' सिनेमाने गोल्डन ज्युबली साजरी केली. हा 1988 सालचा सुपरहिट सिनेमा होता.1990 मध्ये तिने इंद्रकुमार याच्या 'दिल' सिनेमात आमिर खान याच्या नायिकेची भूमिका साकारली. त्या वर्षी हा सिनेमा तिकीट खिडकीवरचा सर्वांत यशस्वी सिनेमा ठरला. या सिनेमातील अभिनयासाठी माधुरीला तिचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

'दिल' सिनेमाच्या यशानंतर माधुरीच्या हिट सिनेमांची जणू काही मालिकाच सुरू झाली. 'साजन' (1991), 'बेटा' (1992),'खलनायक' (1993), 'हम आप के है कौन' (1994), 'राजा' (1995) असे अनेक लोकप्रिय सिनेमे तिने दिले. 'बेटा' सिनेमामधील अभिनयासाठी तिला तिचा दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

'हम आप के है कौन' या सिनेमाने विक्रमी उत्पन्न कमवीत हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करण्याचा उच्चांक गाठला. या सिनेमाने भारतात 65 कोटी रुपयांहून अधिक, तर परदेशांत 15 कोटी रुपयांची कमाई केली. या सिनेमातील अभिनयाने तिला तिचा तिसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. तसेच त्याच वर्षी आलेल्या 'अंजाम' या सिनेमातील भूमिकेसाठीही तिला पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. 'अंजाम' सिनेमामधील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून तिला प्रशंसा मिळाली. 

माधुरीच्या चाहत्यांची यादी लांबलचक आहे. ती तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली. प्रसिद्ध पेंटर दिवंगत एमएफ हुसैनसुद्धा माधुरीचे मोठे चाहते होते. माधुरीच्या प्रेमात आकंठ बुडाले असल्याची कबूली त्यांनी दिली होती. त्यांनी म्हटले होते की, ते सुरुवातीला माधुरीचे पेंटिंग बनवून आनंदीत व्हायचे. ते  माधुरीला साक्षात सरस्वती म्हणायचे. त्यांच्या मनात भीती होती की, माधुरीला भेटल्यानंतर ते आनंदाचे वेडे होतील. हुसैन यांनी माधुरीबरोबर मिळून 'गजगामिनी' हा सिनेमा बनवला. सिनेमाला व्यावसायिक यश मिळू शकले नाही, मात्र समीक्षकांच्या पसंतीची पावती या सिनेमाला मिळाली.

1996 साली रिलीज झालेला माधुरीचा 'प्रेमग्रंथ' हा सिनेमा आपटला. मात्र समीक्षकांनी माधुरीच्या अभिनयाचे कौतुक केले. यानंतर एका मागोमाग एक माधुरीचे सिनेमे फ्लॉप होऊ लागले. मात्र तरीदेखील हिंमत न हारता माधुरीने पुन्हा जोमाने कामाला लागली.शाहरुख खानबरोबरचा 'दिल तो पागल है' या सिनेमाद्वारे माधुरी परतली आणि पुन्हा बॉलिवूडवर आपली जादू चालवली. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आणि या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. या सिनेमाने व्यावसायिक यशासोबतच समीक्षकांची प्रशस्तीही मिळवली.

प्रकाश झा यांच्या 'मृत्युदंड' या सिनेमातही तिने अभिनय केला. या सिनेमाने जिनीव्हा तसेच बँकॉक येथील चित्रपट महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाचे पारितोषिक पटकावले. या सिनेमातील अभिनयासाठी तिला स्टार स्क्रिन आणि सॅन्सूई अवॉर्ड्स मिळाले. त्यानंतर माधुरी संजय लीला भन्साळींच्या 'देवदास' सिनेमात दिसली. हा सिनेमा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला गेला. या सिनेमासाठी माधुरीला सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. 

बातम्या आणखी आहेत...