आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी एक रिमेक:अनिल कपूर-माधुरी दीक्षितच्या ‘तेजाब’चा रिमेक येणार, अधिकार घेतले विकत; कथेला असणार मॉर्डन टच

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कलाकारांची निवड झाली नाही

अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या अभिनयाने सजलेला ‘तेजाब’ची कहाणी पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे. चित्रपट ‘कबीर सिंह’चे निर्माते मुराद खेतानी यांनी याचे अधिकार विकत घेतले आहेत. नुकतेच खेतानी यांनी बिग बी यांचा हिट चित्रपट ‘नमक हलाल’चे रिमेकदेखील विकत घेतले होते. आता 'तेजाब'चा रिमेक बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सूत्रानुसार, चित्रपटाचे अधिकार दोन निर्माते विकत घेणार होते. खेतानीने दुसऱ्या निर्मात्यांपेक्षा जास्त पैसे देऊन अधिकार विकत घेतले. ‘भूल भूलैया 2’ आणि ‘थडम’ पूर्ण होताच खेतानी ‘तेजाब’च्या रिमेकवर काम सुरू करणार आहेत. तेजाबची कथा मॉडर्न टच देऊन बनवण्यात येईल, अशी चर्चा आहे. चित्रपटाचा रिमेक नवीन कलाकारांना घेऊन तयार होणार का, याविषयी माहिती समोर आली नाही. शिवाय या रिमेकमध्ये माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर झळकणार की नाही, याविषयीदेखील अद्याप काहीही सांगितले गेलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...