आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन फन:मुलगा अरिनच्या तालावर थिरकली माधुरी दीक्षित, म्हणाली - 'क्वारंटाईनमध्ये ते करायला मिळाले जे करायची कायमच इच्छा होती'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माधुरी दीक्षितने नुकताच इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.

लॉकडाऊनमुळे सर्व सेलेब्रिटी आपल्या कुटुंबातील सदस्यांसमवेत दर्जेदार वेळ घालवत आहेत. या दिवसांत अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या मुलासोबत डान्स रिहर्सल करत आहे. माधुरीचा लॉकडाऊनचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिचा मुलगा अरिन तबला वाजवत आहे आणि ती पायात घुंगरु बांधून शास्त्रीय नृत्याची तालीम करीत आहे.

माधुरी दीक्षितने नुकताच इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात तिचा मुलगा अरिन प्रोफेशनल अंदाजात तबला वाजवत आहे. माधुरी आपल्या मुलाच्या तालावर पायात घुंगरु बांधून पाय थिरकवत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना माधुरीने लॉकडाऊनवर लिहिले की, 'लॉकडाऊनमध्ये आपल्याला ते करायची संधी मिळत आहे, जे करायची आपली इच्छा होती. शेवटपर्यंत बघा मला नेहमीपासून काय करायचे होते.' माधुरीने आपल्या या व्हिडिओत ट्विट्स आणला आणि ती आपल्या मुलाला नृत्य करायला शिकवताना दिसली. हे बघून माधुरीला आधीपासूनच आपल्या मुलाला नृत्य शिकवायची इच्छा होती, हे दिसून येते. 

यापूर्वीही माधुरीने तिच्या अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती व्हिडिओ कॉलद्वारे रियाझ करताना दिसली होती.  माधुरीला अरिन आणि रेयान हे दोन मुले आहेत. थोरला मुलगा अरिन 17 वर्षांचा आहे.

बातम्या आणखी आहेत...