आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहेत. 'फाइंडिंग अनामिका' या वेब सीरिजच्या निमित्ताने चाहत्यांना तिचे दर्शन घडणार आहे. या वेब सीरिजद्वारे ती पहिल्यांदाच ओटीटी प्लेटफॉर्मवर येत आहे. नुकताच माधुरीच्या या आगामी वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
स्वतः माधुरीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तो शेअर केला आहे, सोबतच तिने त्या खाली लिहिले आहे की, “काय तुम्ही तयार आहात अनामिकाला भेटण्यासाठी? #FindingAnamika, coming soon on Netflix!” करिश्मा कोहली आणि बिजॉय नांबियार यांनी या वेब सीरिजचे दिग्दर्शन केले असून करण जोहरची डिजिटल कंटेंट प्रॉडक्शन कंपनी धर्माटिकने याची निर्मिती केली आहे. तर या चित्रपटाची कथा श्री राव व निशा मेहता यांनी लिहिली आहे,
या वेब सीरिजची गोष्ट एक सुपरस्टार, पत्नी व आई बद्दल आहे, जी अचानक बेपत्ता होते. जिथे पोलिसांसोबतच तिचा चाहतावर्ग अनामिकाच्या बेपत्ता होण्याचे उत्तर मागतो, तर त्यासोबतच तिच्या बेपत्ता झाल्यानंतर अनामिकाच्या जीवनात लपलेले सत्य व दुःखद खोटेपणाचा देखील खुलासा होतो.
माधुरी दीक्षितसह संजय कपूर, मानव कौल, लक्षवीर सरन, सुहासिनी मुळे व मुस्कान जाफरी यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका यात आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.