आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांचे रविवारी (12 मार्च) रोजी निधन झाले. शुक्रवारी (17 मार्च) मुंबईत त्यांच्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक बॉलिवूड कलाकार स्नेहलता यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. प्रार्थना सभेशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षित पती श्रीराम नेनेंसोबत दिसली. दोघांनी हात जोडून मीडियाला अभिवादन केले. यादरम्यान विद्या बालन पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत प्रार्थना सभेला पोहोचली होती. याशिवाय बोनी कपूर, मनीष पॉल, प्रसिद्ध चित्रपट निर्माते सूरज बडजात्या आणि जॅकी श्रॉफही उपस्थित होते.
वयाच्या 91 व्या वर्षी झाले निधन
माधुरी दीक्षितच्या आईने वयाच्या 91 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 12 मार्च रोजी दुपारी वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या आईच्या स्मरणार्थ माधुरी दीक्षितने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक नोट शेअर केली होती.
आई स्नेहलता यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत माधुरी म्हणाली होती, "आज सकाळी उठले आणि मला आईची खोली रिकामी दिसली. जीवन कसे जगायचे हे तिने आम्हाला शिकवले. तिने बऱ्याच लोकांना खूप काही दिले. तिची आम्हाला खूप आठवण येईल”.
श्रीराम नेने झाले भावूक
श्रीराम नेने यांचेही माधुरीच्या आईबरोबर खास नाते होते. त्यांनी भावूक होत स्नेहलता दीक्षित यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला होता. श्रीराम नेने म्हणाले होते, "आमच्या लाडक्या आई स्नेहलता दीक्षित यांचे त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये निधन झाले. मी भावनिक व शारीरिक दृष्टीने खचलो आहे. पण माझे कुटुंब, मित्र आणि तुमच्या प्रेमामुळे हे सगळे सहन करण्याची ताकद मला मिळाली. आम्ही त्यांना कधीच विसरु शकत नाही. कायम त्यांची आठवण येत राहील."
माधुरी आईच्या खूप जवळ होती
माधुरी दीक्षित तिच्या आईच्या खूप जवळ होती. गेल्या वर्षी, अभिनेत्रीने जूनमध्ये तिच्या आईचा 90 वा वाढदिवस देखील साजरा केला होता. ज्याचे काही फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.