आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांचे निधन:वयाच्या 91व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, आज दुपारी होणार अंत्यसंस्कार

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आई स्नेहलता दीक्षित यांचे 12 मार्च रोजी सकाळी निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. माधुरी दीक्षितचे कौटुंबिक मित्र रिक्कू राकेश नाथ यांनी ही माहिती दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार वरळीच्या स्मशानभूमीत दुपारी 3 ते 4 या वेळेत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

माधुरीसाठी तिची आई सर्वकाही
माधुरीने तिच्या आईचा वाढदिवस साजरा केला होता. यादरम्यान तिने आपल्या आईसाठी एक अतिशय प्रेमळ नोट शेअर केली होती. न पाहिलेले फोटो पोस्ट करत माधुरीने लिहिले- 'वाढदिवसाच्या शुभेच्छा. आई. असे म्हणतात की आई आणि मुलगी या चांगल्या मैत्रिणी असतात. यात शंका नाही. तू माझ्यासाठी जे काही केलेस, ती माझ्यासाठी मोठी देणगी आहे. मी तुझ्या चांगल्या आरोग्य आणि आनंदासाठी प्रार्थना करते.'

बातम्या आणखी आहेत...