आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट राज्यपालांच्या खुर्चीसमोर मॉडेलचे फोटोसेशन:नव्या वादाला फुटले तोंड, मायरा मिश्रा नावाजलेली TV अभिनेत्री

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. आता पुन्हा एकदा कोश्यारी चर्चेत आले आहेत. यावेळी एक मॉडेल-अभिनेत्री यामागील कारण ठरली आहे. राजभवनात एका कार्यक्रमासाठी गेलेल्या अभिनेत्रीने थेट राज्यपालांच्या रिकाम्या खुर्चीसमोर फोटोशूट केले आहे. इतकेच नाही तर ते फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे मायरा मिश्रा.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
झाले असे की, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी एका एनजीओच्या काही महिला राजभवनात गेल्या होत्या. त्यांच्यासोबत अभिनेत्री मायरा मिश्रा आणि अभिनेत्री मनीषा कोइराला यांनीही हजेरी लावली होती. राज्यपाल कोश्यारी दालनात येण्याआधी मायरा मिश्राने राज्यपालांच्या रिकाम्या खुर्चीसोबत फोटो काढले. त्यानंतर हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले.

हे फोटो समोर आल्यानंतर राजभवनाने नाराजी व्यक्त केली. राज्यपालांच्या दालनात त्यांच्या अनुपस्थितीत महिलांनी फोटो काढल्याने त्यांना योग्य ती समज दिली गेली.

खरंतर राज्यपालांच्या भेटीआधी मोबाईल बाहेर ठेवण्याचा नियम असताना मोबाईलवरून फोटो काढल्याने राजभवनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. अशा वागण्याने राजभवनाची प्रतिमा मलीन होत असल्याबद्दलही अधिकाऱ्याने नाराजी व्यक्त केली.

मनसेने राज्यपालांना सुनावले खडे बोल
मनसे नेते मनोज चव्हाण यांनी याविषयी ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटसोबत त्यांनी मायरा मिश्राचा फोटो शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये चव्हाण म्हणतात, "ठिकाण राजभवन - ही बाई कोण आहे? अभिनेत्री आणि मॉडेल राजभवनात काय करतेय? राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही?," या ट्वीटनंतर आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

कोण आहे मायरा मिश्रा?
मायरा मिश्रा ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. एमटीव्ही स्प्लिट्सविलाच्या 11 व्या पर्वामध्ये तिने सहभाग घेतला होता. उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेल्या मायराने छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशोका, उडाण, बहू बेगम आणि भंवर सारख्या टीव्ही मालिकांमध्ये ती झळकली आहे. मालिकांबरोबरच मायराने काही म्युझिक व्हिडिओमध्येही काम केले आहे. 'रोना सिखड वे' आणि 'सोनियो 2.0' या म्युझिक व्हिडिओत ती झळकली आहे.

बातम्या आणखी आहेत...