आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांना थोडा दिलासा मिळाला आहे. दंडाधिकारी न्यायालयाने दोघांचा जामीन मंजूर केला आहे, त्यामुळे या दोघांनाही आजची रात्र तुरुंगात घालवावी लागणार नाही. आज (23 नोव्हेंबर) त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली. भारती आणि हर्ष यांच्या जामीन अर्जावर एनसीबी आपले उत्तर आज दाखल करुन सुनावणीसाठी पुढील तारीख मागणार होते.
शनिवारी झाली होती दोघांना अटक
अंमली पदार्थ विरोधी पथकाने भारती सिंगच्या घरावर शनिवारी छापा टाकला होता. त्यावेळी तिच्या घरात अंमली पदार्थ आढळून आल्यामुळे एनसीबीने शनिवारी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष यांनी अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर एनसीबीने एनडीपीएस कायदा 1985, कलम 20 अ, 20 ब 2 आणि 27 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. या दोघांनाही मुंबई किल्ला कोर्ट न्यायालयाने 14 दिवसांची म्हणजे 4 डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली होती. भारती आणि हर्षने जामीनासाठी अर्ज केला होता, त्यावर आज सुनावणी झाली.
कसे समोर आले होते भारती आणि हर्षचे नाव?
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण समोर आले. एनसीबीने शनिवारी सकाळी खार दांडा परिसरात छापा घातला होता. कारवाईत अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून 15 एलएसडी डॉट्स, 40 ग्रॅम गांजा आणि नायट्रोझेपाम औषध आदी अंमली पदार्थ एनसीबीने हस्तगत केले होते. त्याच्या चौकशीतून भारती आणि तिच्या नव-याचे नाव समोर आले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.