आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी आपले मौन सोडले आहे. हे गलिच्छ राजकारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी आदित्य यांच्यावर अनेक आरोप होत आहेत. करण जोहर हा आदित्य ठाकरे यांचा जवळचा मित्र असल्याने त्याची मुंबई पोलिस चौकशी करत नसल्याचा आरोप यापूर्वी अभिनेत्री कंगना रनोट हिने केला होता.
आता आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर आपला संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरु केले आहे. सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी व्यक्तिशः माझ्यावर आणि ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखी आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही, असे आदित्य यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, बॉलिवूडमधील अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत. हा काही गुन्हा नाही. सुशांतचा मृत्यू दुर्दैवी तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलिस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत. ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही, तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुराळा उडवत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही ते म्हणाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.