आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गंगूबाई काठियावाडी' वादात:महाराष्ट्र काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची केली मागणी, म्हणाले -  यामुळे काठियावाडी शहराची प्रतिमा मलीन होतेय

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहराची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप

महाराष्ट्र काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी सोमवारी संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची मागणी केली आहे. चित्रपटाच्या शीर्षकामुळे शहराची प्रतिमा मलिन होत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. अलीकडेच संजय लीला भन्साळी यांच्या वाढदिवशी चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र त्यातील कामाठीपु-याचा उल्लेख आणि शीर्षकातील काठियावाडी हा शब्द अनेकांना खटकला आहे.

1960 च्या दशकात गंगूबाई ही मुंबईतील रेड लाइट एरिया म्हणून प्रसिद्ध असलेल्या कामाठीपुरा-यातील सर्वात शक्तिशाली आणि आदरणीय 'माफिया क्वीन' होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत बोलताना पटेल म्हणाले की, कामाठीपुरा परिसर आता खूप बदलला आहे.

शहराची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप
दक्षिण मुंबईतील मुंबादेवी मतदारसंघाचे आमदार असेलेल अमीन पटेल विधानसभेत म्हणाले, "कामाठीपुरा हा परिसर गेल्या अनेक वर्षांमध्ये खूप बदलला आहे. 1950 च्या दशकात जसा हा परिसर होता, तसा तो आता राहिलेला नाही. आणि आता येथील महिला विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करत आहेत. या चित्रपटाच्या शीर्षकामुळे काठियावाडी शहराचे नाव खराब होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणाची दखल घ्यावी. आणि चित्रपटाचे नाव बदलले पाहिले,' असे अमीन पटेल म्हणाले. हा चित्रपट येत्या 30 जुलै रोजी प्रदर्शित होतोय.

इतकेच नाही तर या चित्रपटातील कामाठीपु-याचा उल्लेख वगळावा, अशी मागणी तेथे राहणा-या स्थानिकांनी देखील केली आहे. या भागात राहात असल्याने विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असून आता नव्याने प्रदर्शित होणा-या चित्रपटामुळे आमच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलण्याची भीती तिथल्या रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

हुसैन जैदी यांच्या पुस्तकावर आधारित आहे चित्रपट
सध्या या चित्रपटाचे मुंबईतील फिल्मसिटी येथे चित्रीकरण सुरु आहे. शूटिंगच्या सेट डिझायनिंगवर तब्बल साडे सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित या चित्रपटात डॉन गंगूबाईची कहाणी दाखवण्यात येणार आहे. असे सांगितले गेले आहे की, गंगुबाई हे 60 च्या दशकात मुंबई माफियाचे एक मोठे नाव होते. गंगुबाई यांना त्यांच्या पतीने केवळ 500 रुपयांत विकले होते. त्यानंतर त्या वेश्या व्यवसायात गुंतल्या. यावेळी त्यांनी अनेक मुलींच्या उन्नतीसाठी काम केले.

चित्रपटात अजय देवगणचा कॅमिओ
या चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी यांनी खूप मेहनत घेतली आहे. चित्रपटाच्या सेटवर त्यांनी बरीच कामे केली आहेत. अनेक आर्किटेक्ट बोलल्यानंतर सेटला अंतिम रूप देण्यात आले आहे. गंगूबाई काठियावाडी चित्रपटात आलिया व्यतिरिक्त अजय देवगण एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात तो आलियाच्या मेंटॉरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात फाळणीच्या आधी आणि नंतरची कथा देखील दाखवण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...