आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी पैलवान आणि गीता-बबिता फोगाट यांचे वडील महावीर फोगाट यांनी अभिनेता आमिर खानकडे मदतीचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, मला कोणत्या कोणत्याही कलाकाराकडून आशा नाहीत, पण आमिर खानने कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ ट्वीट केल्यास मला ते चांगले वाटेल. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या अनेक दिवसांपासून देशातील कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. आंदोलक कुस्तीपटूंनी कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ब्रिजभूषण यांना लवकरात लवकर पदावरून हटवावे, अशी त्यांची मागणी आहे. तसेच त्याच्या विरोधात अटकेची मागणीही खेळाडू करत आहेत. आता महावीर फोगट यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे.
आमिर खानने 2014 मध्ये त्याच्या 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमात फोगाट बहिणींची मुलाखत घेतली होती. त्यानंतर 2016 मध्ये रिलीज झालेल्या 'दंगल' या चित्रपटात आमिर खानने महावीर फोगाटची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने जगभरात सुमारे 2000 कोटींची कमाई केली होती.
मला कोणत्या कलाकाराकडून अपेक्षा नाहीत - महावीर फोगाट
‘इंडिया टुडे’शी बोलताना महावीर फोगाट म्हणाले की, "मला कोणत्याही कलाकाराकडून आशा नाही, पण आमिर खानने कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ ट्वीट केल्यास मला ते चांगले वाटेल." बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर आमिरने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. अलीकडेच आमिर नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या 100 व्या भागाला हजेरी लावली होती.
महावीर यांनी सांगितले मौन बाळगण्यामागील कारण
ते पुढे म्हणाले, "आम्हाला 2014 मध्ये काही आरोपांबद्दल माहिती होती, पण तेव्हा काही बोलायचे नव्हते. माझ्या तीन मुली त्या वेळी राष्ट्रकुल स्पर्धेत खेळत होत्या. तेव्हा आम्ही बोललो असतो, तर अनुशासनहीनतेचे कारण देत सहभागी होऊ दिले नसते. कुस्तीपटूंना कोणत्याही प्रकारचे समर्थन मिळत नाहीये."
ब्रिजभूषणविरोधात कारवाई होणे महत्त्वाचे
महावीर म्हणाले, "सध्या ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई होणे अधिक महत्त्वाचे आहे. करा किंवा मरो अशी परिस्थिती आहे. न्याय मिळेपर्यंत आम्ही आंदोलन करू, या लढ्यात आम्ही सगळे सोबत आहोत. बबिताही या लढ्याचा एक भाग आहे."
दिल्लीला घेराव घालू - महावीर फोगाट
महावीर फोगाट यांनी गरज पडल्यास दिल्लीला घेराव घालू असा इशाराही दिला आहे. "पी टी उषा आणि मेरी कोम या महिला आहेत, त्यामुळे त्यांना याबद्दल जास्त माहिती आहे. आम्हाला चांगला पाठिंबा मिळत असून गरज पडल्यास आम्ही दिल्लीलाही घेराव घालू. आम्ही सरकारच्या विरोधात नाही तर ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आहोत," असे महावीर फोगाट यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.