आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता क्रिकेट जगताव्यतिरिक्त चित्रपट निर्मितीमध्ये उतरणार आहे. धोनी तामिळ चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी धोनीने अभिनेता रजनीकांतचा जवळचा व्यक्ती असलेल्या संजयची निवड केली आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
धोनीचा तामिळ इंडस्ट्रीशी आहे संबंध
मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनी सध्या आयपीएलमध्ये व्यस्त असून या सीझननंतर तो या चित्रपटाची अधिकृत माहिती सांगू शकतो. चित्रपटाचे शूटिंगही याच महिन्यात सुरू होणार आहे. धोनीचे तामिळ चित्रपटसृष्टीशी पूर्वीपासून संबंध आहे. अनेक भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित झालेल्या 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या बायोपिकच्या प्रमोशनमध्येही हा क्रिकेटर सहभागी होता. त्याच्या बायोपिकने दक्षिणेकडील राज्यांमध्येही चांगली कमाई केली आहे.
नयनतारा बरोबर हातमिळवणी
महेंद्रसिंग धोनी लवकरच एका तामिळ चित्रपटाची निर्मिती करणार आहे. धोनीने एका तामिळ प्रोजेक्टची निवड केल्याची माहिती आहे. क्रिकेट आणि चेन्नई सुपर किंग्समुळे एमएस धोनीची तामिळनाडू मोठी लोकप्रियता आहे. याच लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा त्याचा प्रयत्न आहे. धोनीने दक्षिणेतील प्रसिद्ध आभिनेत्री नयनतारा बरोबर हातमिळवणी केलीय. स्पोर्ट्स टायगरने हे वृत्त दिले आहे. चेन्नईला चार वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणारा धोनी आता कॉलीवूडमध्ये नशीब आजमावतोय.
चित्रपट अनेक क्रिकेपटुंची दुसरी इनिंग
मे महिन्याच्या अखेरीस चित्रपटाचे शुटिंग सुरु होणार आहे. तामिळ चित्रपटांमध्ये नशीब आजमावणार धोनी पहिला क्रिकेपटू नाही. क्रिकेट करिअर संपल्यानंतर भारताच्या अनेक क्रिकेटपटूंनी दूसरी इनिंग म्हणून चित्रपटात काम करुन पाहिलय.
नयनतारा सध्या तिच्या आगामी बॉलीवूड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे,ज्यामध्ये तिचे बॉलिवूड पदार्पण आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान दिसणार आहे. त्याचबरोबर अॅटली या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. याशिवाय तो काही तमिळ चित्रपटांचाही भाग आहे. तथापि, निर्मात्यांनी अद्याप त्याच्या भूमिकेबद्दल अधिकृत माहिती सांगतलेली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.